अबब ! कडकनाथ कोंबडी एवढ्या किंमतीत

Kadaknath Rate Comes On Poultry lender Weeks
Kadaknath Rate Comes On Poultry lender Weeks

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - फसवणुकीमुळे आर्थिक संकटात सापडलेले पोल्ट्रीधारक आता अवघ्या 100 रूपयात कडकनाथ कोंबड्यांची विक्री आठवडाबाजारात करीत आहेत. सुरूवातीला सहाशे ते आठशे रूपये कडकनाथचा दर होता. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानतंर सप्टेंबरमध्ये पाचशे रूपयेला जोडीची विक्री केली जात होती; मात्र आता तर 100 रूपयांना विक्री केली जात आहे. कमी दरात कोबंडी मिळत असल्यामुळे ग्राहकही गर्दी करताना दिसत आहेत. 

महारयत ऍग्रो कंपनीने सांगली, कोल्हापुर, बेळगाव, सिंधुदुर्ग अनेक जिल्हयातील पोल्ट्रीधारकांची कोट्यावधी रूपयाची फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल होवुन काहींना अटक देखील झाली आहे. कंपनी आणि पोल्ट्रीधारकांमध्ये काही करार झाले होते. या करारानुसार कंपनीने पोल्ट्रीधारकांना पिल्ले पुरविणे, खाद्य, औषधे पुरविणे व त्याची रक्कम पोल्ट्रीधारकांनी कंपनीला देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

कोंबडी, अंडी दरात घसरण  

कोंबडी किंवा अंडी हमीभावाने खरेदी करण्याची हमी कंपनीकडे होती. कडकनाथ कोंबड्यांची विविध वैशिष्टे सांगण्यात आल्यामुळे अनेक पोल्ट्रीधारक या व्यवसायात कर्ज काढुन उतरले. सुरूवातीला या कोंबड्यांची नर मादी बाराशे ते पंधराशे रूपयाला विक्री केली जात होती; परंतु पोल्ट्रीधारकांची फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आल्यानतंर मात्र कोंबडी, अंडी दरात घसरण झाली.

जोडीचा दर २०० रुपयांवर 

कंपनीकडुन कोंबडी किंवा अंडी खरेदी बंद झाल्यामुळे पोल्ट्रीधारक अडचणीत आले. लाखो रूपये कर्ज काढुन अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला होता; परंतु सध्या हे सर्वच पोल्ट्रीधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. असलेल्या पक्ष्यांवरील खाद्यांचा खर्च पोल्ट्रीधारकांना परवडत नसल्यामुळे कोंबडी विक्रीतुन काही रक्कम मिळविण्याचा प्रयत्न पोल्ट्रीधारक करीत आहेत. सप्टेंबरमध्ये या कोंबड्याच्या जोडीचा दर 500 रूपये होता. परंतु आता हा दर 200 रूपयांवर आला आहे. कडकनाथ कोंबडी फक्त 100 रूपये असे जोरजोरात ओरडत आठवडाबाजारातुन ही विक्री सुरू आहे. ग्राहकही कमी दरात कोंबडी मिळत असल्यामुळे कडकनाथ टेम्पोकडे गर्दी करताना दिसत आहेत. 

गाडीभाड्याचे पैसेही निघणे कठीण

साडेसात लाखांचे कर्ज काढुन हा व्यवसाय सुरू केला. सध्या दोन हजार कडकनाथ पक्षी आहेत. कंपनी अंड्यांची खरेदीच करीत नसल्यामुळे कोंबड्यांवरील खाद्यांचा खर्च वाढत आहे. त्यामुळे आता कोंबड्या विक्रीला काढल्या आहेत. सुरूवातीला दोनशे रूपये दराने विक्री करत होतो; परंतु विक्री कमी होत असल्याने गाडीभाड्याचे पैसेही जमा झाले नाहीत म्हणुन आता 100 रूपये दराने विक्री करीत आहे. 
- अजित पाटील, पोल्ट्रीधारक, भोगावती, जि. कोल्हापूर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com