सावंतवाडीत "कलादालन' महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

सावंतवाडी - कला आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याच्यावतीने 1 एप्रिलला येथील राजवाड्यात "कलादालन' शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी आज येथे दिली. येथील राजवाड्यात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी हुबळी येथील पंडित श्री जयतीर्थ मेवुंडी, कार्यक्रम प्रमुख प्रवीण शेवडे, संदीप सावंत, अस्मिता जयेंद्रन, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते. 

या वेळी राजमाता म्हणाल्या, ""महोत्सव 1 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता राजवाड्यात म्युझियमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत होणार आहे. यासाठी मुंबई येथील रुत्वीक फाउंडेशन कल्चर आंगण आणि स्वरतीर्थ या संस्थाच्या मदतीने हा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात बेंगळुर येथील श्रवण गुजर, पुणे येथील रमाकांत गायकवाड, यल्लापूर येथील वाणी हेगडे, हुबळी धरवाड येथील मेवुंडी आणि आकेरी येथील बासरी वादक धवल जोशी सहभागी होणार आहे. तसेच नव्या कलाकारांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य असून या वेळी संगीत श्रोत्यांनी उपस्थित रहावे.'' 

या वेळी मेवंडुी म्हणाले, ""तळागाळात काम करणाऱ्या कलाकारांना संधी मिळावी या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात येणार आहे. एकाच वर्षी हा महोत्सव न करता तो कायम टीकावा यासाठी प्रयत्न असणार आहेत. यातूून मोठे कलाकार घडावेत, अशी या मागची संकल्पना आहे.'' 

Web Title: kaladalan mahostav

टॅग्स