esakal | कळकवणे : नांदीवसे मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

नांदीवसे मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

नांदीवसे मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : कळकवणे- नांदीवसे मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने गावठाण कडील वाहतूक पुन्हा एकदा बंद झाली आहे. सहयाद्रीच्या पट्ट्यात शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने दसपटीला झोडपून काढले. गेली काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शनिवारी सह्याद्रीच्या खोऱ्यात दिवसभर पाऊस धो धो कोसळला त्यामुळे कळकवणे- नांदीवसे मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेला. शनिवारी सायंकाळी उशीरा ही घटना घडली.

हेही वाचा: हरयाणा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकलं; भात, बाजरीची खरेदी प्रक्रिया उद्यापासून

आमदार निकम यांनी पूरग्रस्त निधीतून ३८ लाखाचा नवीन पुल मंजूर केला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत या पुलावरून वाहतूक सुरळीत सुरु होती मात्र सह्याद्रीच्या खोऱ्यात पावसाचा जोर वाढल्यानंतर नदीतील पाण्याचा वेग वाढला आणि वाढलेल्या पाण्याच्या लोंढ्यात मातीचा भराव वाहून गेला. त्यामुळे गावठाण कडील वाहतूक पुन्हा बंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे आणि आमदार शेखर निकम यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामपंचायती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता मार्फत दोन्ही बाजूने सूचना फलक लावण्याचा सूचना केल्या आहेत. रविवारी सकाळी या पुलाची पाहणी केल्यानंतर वाहतुकीच्या संदर्भात आणि पुलाच्या दुरुस्ती संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

loading image
go to top