रत्नागिरी : कळझोंडी ग्रामस्थांचा वाटद एमआयडीसीला विरोध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

रत्नागिरी तालुका किंवा जिल्ह्याचा आढावा घेताना असे निदर्शनात येते की, वाटदमध्ये एमआयडीसीची गरज काय? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड - चिपळूण - रत्नागिरी मिरजोळे व रत्नागिरी निवळी अशा जागा व एमआयडीसी आहेत. यामध्ये 99 टक्के एमआयडीसी बंद वा जेमतेम सुरू आहेत. मग वाटदला एमआयडीसी कशासाठी?

रत्नागिरी - सध्या वाटद एमआयडीसीचा विषय जोरात चर्चेत आहे. कळझोंडी ग्रामस्थांचा वाटद एमआयडीसीला विरोध आहे, असे प्रतिपादन येथील ग्रामस्थ अवधूत मुळे यांनी केले.

याबाबत ते म्हणाले, रत्नागिरी तालुका किंवा जिल्ह्याचा आढावा घेताना असे निदर्शनात येते की, वाटदमध्ये एमआयडीसीची गरज काय? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड - चिपळूण - रत्नागिरी मिरजोळे व रत्नागिरी निवळी अशा जागा व एमआयडीसी आहेत. यामध्ये 99 टक्के एमआयडीसी बंद वा जेमतेम सुरू आहेत. मग वाटदला एमआयडीसी कशासाठी? त्याचा उपयोग काय? स्थानिकांचा फायदा काय? चिपळूण लोटेमध्ये भयानक त्रास होत आहे.

कळझोंडी गावाचा विचार करता, येथे गावामध्ये धरण आहे. त्या धरणाचे पाणी 20 ते 22 गावांना व सुमारे 135 वाड्यांना पाणी पुरवठा करत आहे. तसेच काही लोकांची घरे व तेवढीच जागा शिल्लक आहे. त्यामुळे ते भूमिहीन होत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961च्या कलमची नोटीस ग्रामसभेला संबोधित करण्यात यावी. 21 ऑगस्टला जी नोटीस निघाली, ती 16 सप्टेंबरला काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. त्या 26 दिवसांमधला फरक, यामधील गौडबंगाल काही कळत नाही, यावरुन नक्की एमआयडीसी कोणाला पाहिजे? हेच कळत नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalzhondi villages oppose to Watad MIDC