वीरपत्नी कनिका रावराणे भारतीय सैन्यात होणार रूजु

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

वैभववाडी - शहीद कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका रावराणे या भारतीय सैन्यात रूजु होणार आहेत. भारतीय सैन्याकडुन तशाप्रकारचा दूरध्वनी त्यांना आला असुन ऑक्‍टोबरमध्ये त्या सैन्यात दाखल होणार असल्याची माहीती त्यांचे नातेवाईक विजय रावराणे यांनी दिली.

वैभववाडी - शहीद कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका रावराणे या भारतीय सैन्यात रूजु होणार आहेत. भारतीय सैन्याकडुन तशाप्रकारचा दूरध्वनी त्यांना आला असुन ऑक्‍टोबरमध्ये त्या सैन्यात दाखल होणार असल्याची माहीती त्यांचे नातेवाईक विजय रावराणे यांनी दिली.

सडुरे (ता. वैभववाडी) येथील मेजर कौस्तुभ रावराणे हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. 2011 मध्ये ते लेफ्टनंट या पदावर ते लष्करी सेवेत रूजु झाले. त्यानतंर त्यांना 2013 मध्ये कॅप्टनपदी तर 2018 मध्ये त्यांना मेजरपदी बढती मिळाली. त्यावेळी ते सीमेवर 36 वी बटालियन दी राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 ला काश्‍मिर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. या प्रकारानंतर तालुक्‍यासह राज्यांवर शोककळा पसरली होती. कौस्तुभवर मुंबईत राहत असलेल्या मीरा भाईंदर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर तालुक्‍यात अस्थीकलश आणण्यात आला होता.

मेजर कौस्तुभ रावराणेंच्या पश्‍यात पत्नी कनिका, दोन वर्षाचा मुलगा आणि आई वडील असा परिवार आहे. कौस्तुभ शहीद झाल्यानंतर तिथीनुसार 27 जुलैला वर्ष झाले. याच दिवशी भारतीय सैन्यातुन वीरपत्नी कनिका रावराणे यांना भारतीय सैन्यात दाखल होण्याचे संकेत दिले आहेत. श्रीमती रावराणे या ऑक्‍टोंबर 2019 मध्ये सैन्यात दाखल होणार आहेत. कौस्तुभचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण सैन्यात दाखल होत असल्याचे नातेवाईकांकडे बोलताना स्पष्ट केल्याचे सडुरे येथील त्यांचे नातेवाईक विजय रावराणे यांनी सांगीतले.
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanika RaoRane to join Indian Army