आयटीआय प्रवेशाची पहिली यादी ६ ला प्रसिद्ध

तुषार सावंत
शुक्रवार, 30 जून 2017

ऑनलाईन नोंदणी - तालुक्‍यासाठी ७० टक्के जागा

ऑनलाईन नोंदणी - तालुक्‍यासाठी ७० टक्के जागा

कणकवली - जिल्ह्यातील आठही आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून यंदा पहिली यादी ६ जुलैला प्रसिद्ध होणार आहे. ही निवड प्रक्रिया यावर्षी २ जुलैपर्यंत राबविली जाणार असून प्रवेश फेऱ्या या ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ३ जुलैपर्यंत मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर शुल्क भरणा केली जाईल. त्यानंतर प्रवेश निश्‍चित होतील. जिल्ह्यातील आयटीआयमध्ये दहावी पास-नापास विद्यार्थ्यासाठी १ आणि २ वर्षाचे विविध तांत्रिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तालुका स्तरावर ७० टक्के तर उर्वरितांना ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया यंदा एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. तसेच प्रवेशाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  

दहावीला कमी गुण मिळालेल्यांना पुढे काय करावे असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे कला, कौशल्य गुण मिळविण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत दहावी पास- नापास विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय अभ्यासक्रम आहेत. आयटीआय शिक्षणासाठी अत्यंत नाममात्र शुल्क आकारले जाते. यात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून राखीव १०० आणि खुल्या गटाला १५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जातील. 

जिल्ह्यातील आयटीनिहाय उपलब्ध ट्रेडनुसार प्रवेशाच्या जागा अशा - फोंडाघाट आयटीआयमध्ये एक वर्षासाठी दहावी पास -नापास विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्लंबर २६ जागा तर दहावी पाससाठी सीट मेटल  २१ जागा, मॅकॅनिक ऑटो इलेक्‍ट्रीकल ॲण्ड इलेक्‍ट्रॉनिक २१ जागा, कॉम्प्यूटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क टेक्‍निशियन २६ जागा, फॅशन टेक्‍नॉलॉजी ॲण्ड डिझाईन २१ जागा तर इंटीरीयर डेकोरेशन ॲण्ड डिझाईनसाठी २६ जागा आहेत. ओरोस आयटीआयमध्ये दोन वर्षासाठी मॅकॅनिक मोटर वेल्डींग, इलेक्‍ट्रीकल, फीटर आणि ड्रासमनच्या प्रत्येकी २१ जागा असून इलेक्‍ट्रॉनिक मॅकॅनिक आणि इन्फरमेशन कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजीच्या प्रत्येकी २६ जागा आहेत. तसेच एक वर्षासाठी दहावी पास विद्यार्थ्यांना डिझेल मॅकॅनिक आणि ड्रेस मेकींग प्रत्येकी २१ जागा, फुड प्रोसेसिंग प्रॉडक्‍टच्या ५२ तर दहावी पास-नापाससाठी वेल्डरच्या २१ जागा उपलब्ध आहेत. वैभववाडी तालुक्‍यातील आयटीआयमध्ये दहावी पास-नापास विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी वेल्डर तर मुलींसाठी शिलाई टेक्‍नॉलॉजीच्या २१ जागा आहेत. दहावी पाससाठी डिझेल मॅकॅनिक २१ जागा तर इलेक्‍ट्रॉनिक मॅकॅनिक दोन वर्षाचा दहावी पाससाठी २६ जागा आहेत. मालवणमध्ये दोन वर्षासाठी दहावी पासला फिटर २१ जागा, आरएसी मॅकॅनिक २६ जागा, एक वर्षासाठी दहावी पासनापासला वेल्डर ४२ जागा तर दहावी पाससाठी मॅकॅनिक डिझेल ४२ तर ड्रेस मेकींगच्या २१ जागा आहेत. दोडामार्गमध्येय रेफ्रीजरेटर आणि एअर कंडीशन दोन वर्षासाठी दहावी पास, इलेक्‍ट्रॉनिक, मॅकॅनिक दोन वर्ष दहावी पास मुला-मुलींसाठी तर एक वर्ष मुलींना प्राधान्य असलेला कॉम्प्यूटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून येथे प्रत्येकी २६ जागा उपलब्ध आहेत. सावंतवाडी आयटीआयमध्ये दोन वर्षासाठी दहावी पासला फिटर, टर्नर २१ जागा, इन्फरमेशन कम्युनिकेशन ॲण्ड टेक्‍नॉलॉजी २६ जागा तर दहावी पास नापाससाठी वायरमनला २१ जागा उपलब्ध आहेत.

एक वर्षासाठी दहावी पास-नापास सुतार काम २६ जागा, शिवणकाम टेक्‍नॉलॉजी दहावी पास-नापास ४२ जागा आहेत. तर दहावी पाससाठी कॉम्प्युटर ऑपरेटींग प्रोग्रॅमिंग एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. दोन वर्षासाठी ड्रासमन सिव्हील आणि मोटर मॅकॅनिक हा दहावी पाससाठी अभ्यासक्रम आहे. 

वेंगुर्ले आयटीआयमध्ये दोन वर्षासाठी इलेक्‍ट्रीशन, वायरमन आणि आयसीटीएसएम दोन वर्षाचा दहावी पास तर एक वर्षासाठी वेल्डर दहावी पास-नापास ४२ जागा, मुलींसाठी ड्रेसमेकींग दहावी पास एक वर्षाचा २१ जागांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. देवगड आयटीआयची माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र जिल्ह्यातील तरूणांना रोजगाराभिमुख शिक्षणासाठी आयटीआय प्रवेश प्रक्रीया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रवेश प्रक्रीयेमध्ये बदल 
केंद्र सरकारने कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला असून राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू आहे. कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम निर्माण करून रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचा कला राज्यशासनाचा आहे. त्यामुळे पायाभूत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या शोधात असलेल्यांना तंत्रशिक्षण विभागाच्या संस्थेची दारे खुली झाले आहेत. अकरावी प्रवेशाला नियमित शाखांकडे मोठी गर्दी झाल्याने पालकांना प्रवेश मिळविणे कठीण झाले आहे. परंतु जे विद्यार्थी व्यवसायाभिमुख शिक्षण घेणार आहेत त्यांना आयटीआयचा मार्ग मोकळा आहे. यंदा पहिल्या फेरीची यादी ६ जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर रिक्त असलेल्या जागांसाठी प्रवेश प्रक्रीया राबविली जाईल. यंदाच्या प्रवेश प्रक्रीयेमध्ये तंत्रशिक्षण विभागाने बदल केला आहे.

Web Title: kankavali konkan news iti admission first list 6th july