आयटीआय प्रवेशासाठी २ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

कणकवली - राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०१७ मधील केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १९ जून ते २ जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. या प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी ६ जुलैला प्रसिद्ध होणार असून प्रत्येक प्रशिक्षण संस्थेमध्ये मार्गदर्शन पुस्तिका १ जुलैपर्यंत उपलब्ध होणार आहे. 

प्रवेश पद्धती, नियमावली प्रवेश संकेतस्थळाबाबत शंका असल्यास संचालनालयाच्या मदत कक्षासह मोफतपणे संपर्क करता येणार आहे. 

राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश अर्ज स्वीकृत केंद्र असून उमेदवारांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी स्वीकृती आणि निश्‍चिती करून मिळणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (http://admission.dvet.gov.in)  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांच्या नोंदणी क्रमांक हाच युजर आयडी म्हणून तयार होईल. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत घेवून प्रवेश निश्‍चित करावा. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प तसेच प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर ऑप्शन फॉर्मची प्रत घ्यावी. याबाबतची माहिती पुस्तिकेमध्ये भाग १ आणि २ मध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांना प्रवेश अर्जासोबत राखीव प्रवर्गासाठी १००  आणि खुल्या प्रवर्गासाठी १५० इतकी आकारण्यात येईल. प्रवेश फेऱ्या या ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ३ जुलैपर्यंत मुल कागदपत्राच्या तपासणीनंतर अर्ज शुल्क भरणा करून पूर्ण होणार आहेत. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहायक विकल्प तसेच प्राधान्य सादर करण्यासाठी १९ जून ते ४ जुलै सायंकाळी ५ पर्यंत मुदत आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी संकेत स्थळावर ६ जुलैला सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होणार असून उमेदवारांना एसएमएसद्वारेही कळविले जाणार आहे. गुणवत्ता यादीच्या हरकतीसाठी ६ जुलै सकाळी ११ ते ७ जुलै सायंकाळी ५ पर्यंत मुदत राहील. पहिल्या यादीनंतर पुढील फेऱ्यांबाबतचे स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे.

Web Title: kankavali konkan news iti admission process 2 july