कोकण रेल्वे मार्गावर स्थानकांची संख्या वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

कणकवली - कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी प्रचंड प्रमाणात निधी लागणार आहे. तेवढी तरतूद केंद्राकडून न झाल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने स्थानकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या पाच वर्षांत नव्या ३१ स्थानकांची भर पडणार आहे. त्यातील २१ स्थानकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविले आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या ६५ स्थानके आहेत, तर ११ नव्या स्थानकांची उभारणी सुरू करण्यात आली आहे. यात आणखी नवीन ३१ स्थानकांची भर पडल्यानंतर रोहा ते ठोकूर या ७४१ किलोमीटर लांबीच्या मार्गावर एकूण १०७ स्थानके होणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर स्थानकांची संख्या वाढल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबून राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. मार्गावर सध्या रोहा ते वीर हा ४६ कि.मी.चा टप्पा दुहेरी केला जात आहे. पुढील वर्षअखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षी रोहा ते पनवेल पर्यंतचा मार्ग दुपदरीकरण झाला आहे. 

कोकण रेल्वे मार्गावरील बोगदे वगळता इतर मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव कोकण रेल्वे प्रशासनाने तयार केला होता. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वेचा कार्यभार राहिला नसल्याने कोकण रेल्वे दुपदरीकरणाचा प्रस्ताव मागे पडला आहे. मात्र कोकण रेल्वेचे मार्ग वेगवान होण्यासाठी स्थानके वाढविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्थानके वाढल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता आणि वेग वाढणार आहे. 

नव्या २१ स्थानकांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गातील साकेडी, ओसरगांव आणि कसाल येथे स्थानकांची उभारणी होण्याची शक्‍यता रेल्वेकडून व्यक्‍त झाली. रेल्वे बोर्डाचे मान्यता दिल्यानंतरच या स्थानकांच्या नावांची घोषणा होणार आहे. सर्व २१ स्थानकांच्या उभारणीचा खर्च खर्च ४ हजार ९८० कोटी रुपये आहे.

कोकण रेल्वे मार्गावर दिवसभरात ५२ प्रवासी गाडया आणि १८ मालगाड्‌या धावतात. सद्यःस्थितीत १२ ते १५ किलोमिटर दरम्यान एक स्थानक आहे. सध्या सुरू काम सुरू असलेली १० स्थानके तसेच नवीन २१ स्थानकांची उभारणी झाल्यास, दोन स्थानकांमधील अंतर ५ ते ७ किलोमिटर होणार आहे. ही स्थानके कार्यान्वित झाल्यास गाड्यांच्या क्रॉसिंगचा वेळ कमी होणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचीही संख्या वाढणार असल्याची माहिती रेल्वेसुत्रांकडून देण्यात आली.

नव्या स्थानकात ट्रॅकचे काम वर्षाखेरपर्यंत
मार्गावर नवीन ११ स्थानकांच्या उभारणीची घोषणा झाली होती. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण व आचिर्णे, रायगडातील इंदापूर, गोरेगाव रोड आणि सापेबामणे तर रत्नागिरीतील कडवई, कळंबणी, पोमेंडी आणि वेरवली या स्थानकांचा समावेश होता. नंतर यातून पोमेंडी स्थानक वगळण्यात आले. उर्वरित सर्व स्थानकांची भूमिपूजने वर्षभरापूर्वी झाली. सद्यःस्थितीत या नव्या स्थानकात ट्रॅक बांधणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पुढील वर्ष अखेरपर्यंत इमारत व इतर कामे पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: kankavali konkan news konkan railway station increase