चिकन विक्रेत्यावर नगरपंचायतीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कणकवली - शहरातील राष्ट्रीय महामार्गलगतच्या गांगोप्रासाद इमारतीमधील चिकन दुकान बंद करण्यास नगरपंचायतीने आज भाग पाडले. नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दुर्गंधी आणि अस्वच्छता असल्याने चिकन दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी नगरपंचायतीकडे 
केली होती.

शहरातील गांगोप्रासाद इमारतीमध्ये गेल्या दीड वर्षापासून चिकन विक्री व्यवसाय सुरू करण्यात आला होता. या दुकानामध्ये स्वच्छता राखली जात नसल्याने परिसरात दुर्गंधी होते. कोंबडीची पिसे व इतर अवशेष त्याच परिसरात टाकले जातात. तक्रारी करूनही स्वच्छता राखली जात नाही. यामुळे येथील नागरिकांनी गेले वर्षभर नगरपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. यानंतर आज मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्यासह नगरपंचायत पथकाने गांगोप्रासाद येथील चिकन व्यवसायाची पाहणी केली. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना दुकान बंद करावे किंवा अन्यत्र स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार चिकन व्यावसायिकाने तातडीने दुकान बंद केले. 

या चिकन दुकानाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने ते बंद करण्यास भाग पाडावे लागल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.गायकवाड यांनी दिली.

Web Title: kankavali konkan news nagarpanchyat crime on chicken sailer