वृक्ष लागवडीची नोंदणी मोबाईल ॲपवर

तुषार सावंत
शुक्रवार, 30 जून 2017

१ ते ७ जुलैला मोहीम - वनविभागाकडून अल्पदरात विविध रोपे उपलब्ध

कणकवली - राज्यात १ ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून भव्य वनमहोत्सव होत आहे. या वनमहोत्सवात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लागवडीची नोंदणी सरकार दरबारी करण्यासाठी आता ‘माय प्लांट मोबाईल ॲप’ डाऊनलोड करावे लागणार आहे. हरित महाराष्ट्रासाठीचे हे मोबाईल ॲपचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या ॲपद्वारे राज्याची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे. 

राज्यात गतवर्षी २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज ओळखून राज्याच्या वनविभागाने यंदा तर ४ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले. सिंधुदुर्गात यंदा जवळपास दीड लाख वृक्षवाटिका तयार केल्या आहेत. या रोपांची लागवड करण्यासाठी शेतकरी जमीनदारांना प्रोत्साहित केले जात असून वनविभागातर्फे अल्पदरात वृक्षवाटपही केले जात आहे. जे शेतकरी वनमहोत्सवाच्या या चळवळीत सहभाग घेणार आहेत, त्यांना ‘माय प्लांट मोबाईल ॲप’द्वारे नोंदणी करता येणार आहे.

राज्य शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रमात शासकीय विभागांना उद्दिष्ट दिले आहे. त्याची पूर्तता वृक्ष प्रजातीची सर्व माहिती वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची सुविधा आहे. मात्र खासगी शेतकरी जमीनदार, बागायतदार, सामाजिक आध्यात्मिक स्वयंसेवा संस्था, उद्योग व्यापार क्षेत्रातील मंडळींकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे. अशा लोकसहभागातून किती वृक्षांची लागवड झाली, कोणत्या प्रजातीची, कोणत्या भागात झाडांची लागवड झाली याची माहिती वनविभागाच्या संगणक प्रणालीवर नोंदविण्याची सुविधा यंदा वनविभागाने निर्माण केली आहे. त्यासाठी  ‘माय प्लांट मोबाईल ॲप’ प्रत्येकाला उपयोगात 
येणार आहे. या मोबाईल ॲपवर व्यक्ती किंवा संस्थांना आपल्या लागवड क्षेत्राची माहिती नोंदविता येणार आहे. माय प्लांट हे मोबाईल ॲप १ ते ७ जुलै या कालावधीत सुरू होईल. ज्या व्यक्ती किंवा संस्थांना सहभाग नोंदवायचा आहे. अशांना हे ॲप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे.

Web Title: kankavali konkan news tree cultivation registration on mobile app