वृक्षसंवर्धनासाठी राज्य शासन राबविणार वनमहोत्सव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

शाळा, संस्था, नागरिकांचा सहभाग : ५ जून ते ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत हजारो वृक्षांची होणार लागवड

कणकवली - वृक्षसंवर्धनाच्या चळवळीला बळकटी येण्यासाठी राज्य शासनातर्फे ५ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘वनमहोत्सव’ राबविला जाणार आहे. यात शाळा, संस्था आणि नागरिकांच्या पुढाकाराने हजारो वृक्षांची लागवड होणार आहे. यात विविध जातींची रोपे शासनाकडून ना नफा ना तोटा तत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

शाळा, संस्था, नागरिकांचा सहभाग : ५ जून ते ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत हजारो वृक्षांची होणार लागवड

कणकवली - वृक्षसंवर्धनाच्या चळवळीला बळकटी येण्यासाठी राज्य शासनातर्फे ५ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘वनमहोत्सव’ राबविला जाणार आहे. यात शाळा, संस्था आणि नागरिकांच्या पुढाकाराने हजारो वृक्षांची लागवड होणार आहे. यात विविध जातींची रोपे शासनाकडून ना नफा ना तोटा तत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

शासनाकडून दरवर्षी वनमहोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदाचा वनमहोत्सव पूर्णत: यशस्वी होण्यासाठी शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. यात सर्व शाळांतील मुलांना प्रामुख्याने सहभागी करून घेण्यात आले आहे. याखेरीज विविध सामाजिक, सेवाभावी संस्था आणि नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. सर्व शासकीय रोपवाटिकांमधून विविध प्रजातींची रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत जनजागृती देखील केली जाणार आहे.

यंदा होणाऱ्या वृक्ष लागवडीमध्ये इंधन, हलक्‍या इमारतीसाठी वापरले जाणाऱ्या लाकडाचे वृक्ष, चारा, सरपणासाठी उपयुक्‍त प्रजाती, सर्वसाधारण फळवृक्ष, मौल्यवान फळवृक्ष, मौल्यवान प्रजाती, बांधावर लावण्यासाठीची झाडे, शोभिवंत वृक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या वनमहोत्सवात सर्व नागरिकांनी ही झाडे लावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील शासनाने केले आहे.

वनमहोत्सवांतर्गत उपलब्ध होणारी रोपे
सुबाभूळ, निलगिरी, महारूख, पांगरा, ऑस्ट्रेलियन आकेशिया, अंजनमी, काशीद, शिरंब, लिंबू, कारंज, विलायती चिंच, बोर,  आवळा, सीताफळ, शेवगा, जांभूळ, हादगा, रायवळ आंबा, मोह कवट, बेहडा, हिरवा वड, उंबर, पिंपळ, बिबा, बेल, खिरली, शिवणा, बिजा, बांबू, रातराणी, बोंगलवेल, काजू, रातांबा, चारोळी आदी झाडांची रोपे ७ ते १५ रुपयांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर साग रोप बारा रुपये, सिल्वर ओक, स्ट्रथोडिया, गुलमोहर, जाकसंडा, अवतांश, चाफा रेनशी, कांचन, पारिजात ही रोपे नऊ ते ११ रुपयांना. वड, चाफा, पांजरा, सांबर, शेवगा, महारूक, पॉपलर, तुनी ही रोपे बारा रुपयांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

रोपांसह जमिनीची समस्या
वनमहोत्सवात सामाजिक आणि सेवाभावी संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रजातींची रोपे उपलब्ध करून देण्याची शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या यादीपैकी बहुतांश रोपे जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये उपलब्धच नसल्याचे चित्र आहे. याखेरीज जिल्ह्यात सामाईक जमिनीची समस्या असल्याने वनमहोत्सवाचे उद्दिष्ट कितपत सफल होणार याबाबतही साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

Web Title: kankavali konkan news vanmahotsav for ree promotion by state government