टोमॅटोसह भाजीचे दर कडाडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कणकवली - कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यावर अवलंबून राहिल्याने जिल्ह्यातील ग्राहकांना सध्या वाढत्या दराचा भाजीपाला खेरदी केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात येणाऱ्या भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. विशेषतः रोजच्या आहारातील टोमॅटो, मिरचीचे दर कडाडल्याने गृहिणींनी आपला मोर्चा कडधान्यानकडे वळवला लागला आहे.

जिल्ह्यात सध्या मासेमारीही बंद असल्याने मासे महागले आहेत. यातच ब्राॅयलर कोंबडीचे दर नेट किलोला १७० वर पोचले. यामुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. सध्या टोमॅटोचा दर किलोला ६० रुपयेवर पोचला आहे; तर कोबी, भेंडी, कारली, काकडीने ६० रुपये गाठले आहेत. फ्लॉवर ८० रुपयेवर गेले आहे. पालेभाज्यांचे दर नियंत्रणात असले तरी सध्याच्या पावसाळात भाजीपाल्याला फारशी मागणी नाही. यामुळे गृहिणींना आता कडधान्यावर वेळ निभावावी लागत आहे. १० दिवसांवर श्रावण मासाला सुरुवात होणार असल्याने भाज्यांचे दर अजून भडकण्याची शक्‍यता आहे. यंदा पावासाला वेळीच सुरवात झाली असली तरी मध्यंतरीच्या शेतकरी आंदोलनामुळे शेतीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसही लांबला. यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. सिंधुदुर्गात कर्नाटकातील बेळगाव आणि परिसरातील भाजीपाला मोठ्या संख्येने विक्रीसाठी येथे दाखल होतो. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, राधानगरी या भागातील शेतकरी भाजीविक्रीसाठी येतात. परंतु शेतकऱ्यांकडून भाजी विक्रीसाठी अजूनही बाजारात दाखल झालेली नाही. पेरणी लांबल्यामुळे आणि मागणी वाढल्यामुळे भाज्यांचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. श्रावण महिन्यात भाज्यांचे दर अजूनही वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

भाजीचे दर
टोमॅटो     ८० रु. किलो
भेंडी     ६० रु. किलो
मिरची     १०० रु. किलो
कारली     ६० रु. किलो
फ्लॉवर     ८० रु. किलो
कोबी     ६० रु. किलो

Web Title: kankavali konkan veegetable rate increase by rain