एसटी कर्मचारी जाणार संपावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

कणकवली - राज्य शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे ज्या वेळी इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याची घोषणा होईल, त्याचक्षणी राज्यातील सर्व एस. टी. कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा एस. टी. इंटक संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी आज येथे केली.

वेतन आयोगासाठी मान्यताप्राप्त संघटनेसह सर्वच संघटनांनी एस. टी. महामंडळ आणि शासनाशी चर्चा केली. वाटाघाटी केल्या पण शासन वेतन आयोग द्यायला तयार नाही. यामुळे राज्यभरात मतदान घेण्यात आले. यात मान्यताप्राप्त सह सर्व एस. टी. संघटना सहभाग झाल्या. तर ८५ टक्‍के कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे. 

Web Title: kankavali news msrtc