ग्रामपंचायत प्रभाग रचनाही  होणार ऑनलाईन पद्धतीने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

कणकवली - येत्या काळात जिल्ह्यातील ३४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूकाची सर्व प्रक्रीया यंदा ऑनलाईन होणार आहे. मतदार नोंदणीनंतर मतदार संख्येनुसार होणारी प्रभाग रचनाही ऑनलाईन होणार आहे. 

कणकवली - येत्या काळात जिल्ह्यातील ३४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूकाची सर्व प्रक्रीया यंदा ऑनलाईन होणार आहे. मतदार नोंदणीनंतर मतदार संख्येनुसार होणारी प्रभाग रचनाही ऑनलाईन होणार आहे. 

विकास यंत्रणेचा शेवटचा दुवा म्हणजे ग्रामपंचायत मानली जाते. गेल्या चार वर्षांपासून ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाचे थेट अनुदान मिळत असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला फारच महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातील डिंसेबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणूका यंदा ऑक्‍टोबरमध्ये होणार आहेत. त्याअनुषंगाने निवडणूक विभाग कामाला लागला आहे. यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरपंचपदाची निवड ही थेट लोकामधुन घेण्याची तयारी असून सरपंच पदाच्या खुल्या राखीव जागेसाठी किमान बारावी पास उमेदवार आणि आरक्षित जागेसाठी दहावी पास उमेदवार असावा असा विचार सुरू झाला आहे. तसा प्रस्ताव राज्याच्या ग्रामविकास विभागाने तयार केला असून पावसाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे. मात्र हा निर्णय लांबला तरी यंदा निवडणूकीची प्रक्रीया ऑनलाईनच होणार आहे. यापुर्वी राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रीया काही भागात राबवून यशस्वी केली आहे. त्यामुळे यंदा प्रभाग रचनेपासून सर्व प्रक्रीया ऑनलाईन होण्याची शक्‍यता आहे.

मतदार नोंदणी
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर येत्या १ जुलै या अंतिम मुदतीत मतदार यादी निश्‍चित केली जाणार आहे. यासाठी २० जूनपर्यंत नावनोंदणी केली जाणार आहे. मतदार यादीतील नावात दुरूस्ती, नावात बदल  किंवा नवीन नाव नोंदणी या कालावधीत होणार आहे.

Web Title: kankavali news online gram panchayat