कणकवलीत तब्बल १५७ मि.मी. पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कणकवली - विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने कणकवलीस झोडपले. चोवीस तासात १५७ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली असून कलमठ येथे दोन घरावर वीज पडून दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून शहरी भागात वीज आणि दूरध्वनी बारातासानंतर पूर्वपदावर आला आहे. ग्रामीण भागात मात्र वीज खंडित असून फोंडा परिसरात दोन शेतकऱ्यांच्या घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. 

मॉन्सूनपूर्व पावसाचे जिल्ह्यात आज दमदार आगमन झाले. तालुक्‍यात आतापर्यंत २५२ मि.मी. इतका पाऊस झाला असून गेल्या २४ तासात मात्र १५७ मि.मी. इतकी विक्रमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी रात्री कलमठ बाजारपेठेत वीज पडल्याने सुहासिनी पेडणेकर यांचे ९० हजाराचे तर दर्शना पेडणेकर यांचे ८९ हजाराचे नुकसान झाले. फोंडाघाट येथे उदय संभाजी सावंत यांच्या घराचे ४४८० रूपये आणि मंगेश सावंत यांच्या घराचे ३००० रुपयेचे नुकसान झाले. तालुक्‍यातील सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातील केरकचरा नदी नाल्यामधून वाहून गेला. शेतशिवार पाण्याने भरले असून काही ठिकाणी भातपेरणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बहुतांशी गावात झाडे पडल्याने वीज आणि दूरध्वनी खंडित झाला होता. कणकवली शहरातही वीज खंडित झाली होती.

Web Title: Kankavali news rain