महागाईच्या झळीपासून रेशीमधागा दूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कणकवली - बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. सर्वच ठिकाणी राखी खरेदीसाठी गर्दी आहे. यात वैशिष्ट्य म्हणजे यंदा राख्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही. पाच रुपयांपासून शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.

आपल्या भावाच्या हाताला शोभून दिसेल, त्याला रुचेल, त्याला आवडेल, अशी राखी शोधण्यासाठी सध्या महिलावर्गाची दुकानांमध्ये गर्दी पहावयास मिळत आहे. 

ग्राहकांचा हा चोखंदळपणा लक्षात घेऊन बाजारातील दुकानांमध्येही राख्यांची स्वतंत्र आणि आकर्षक अशी मांडणी केली आहे. ग्राहकांचे चटकन लक्ष वेधून घेता यावे, यासाठी अनेक दुकानांमध्ये राख्यांभोवती आकर्षक रोषणाई देखील करण्यात  आली आहे. 

सिल्व्हर व गोल्डन मेटलच्या, डायमंड तसेच सुती, रेशमी अशा विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या राख्या उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीसाठी छोटा भीम, मोटूपतलू, डोरेमोन अशा विविध कार्टूनच्या राख्यादेखील  आल्या आहेत.

पोस्ट, कुरिअरसेवा विस्कळीत
मुंबई, पुणे या मोठ्या शहरासह राज्यात आणि राज्याबाहेर देखील अनेक भाऊराया नोकरी, व्यवसायासाठी गेले आहेत. त्यांना मागील आठवड्यापासून बहिणींनी पोस्ट, कुरिअर आदी सेवांच्या माध्यमातून राख्या पाठविल्या आहेत. मात्र राख्या पाठवून आठ ते दहा दिवस उलटले तरी भाऊरायांना राख्या पोहोचलेल्या नाहीत. निदान रक्षाबंधनापर्यंत तरी या राख्या पोहोचाव्यात, अशी अपेक्षा भगिनींना आहे.

‘फ्रेंडशीप डे’साठीही दुकाने सजली
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी म्हणजेच यंदा ६ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा होत आहे. आयुष्यभराच्या दुनियादारीमध्ये साथ देणाऱ्या मित्र मैत्रीणींसाठी ‘फ्रेंडशीप डे’ महत्वाचा असतो. हा दिवस साजरा करण्यासाठी दुकानांमध्ये फ्रेंडशिप बॅंड आणि गिफ्टच्या विविध व्हरायटी देखील दुकानांमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

Web Title: kankavali news Raksha Bandhan