सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ धरणे १०० टक्के भरली

तुषार सावंत
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कणकवली -  जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी गेल्या तीन महिन्यात सरासरी दोन हजार मिलीमीटरचा टप्पा पावसाने गाठला आहे. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने ३५ पैकी १७ धरणांची पातळी शंभर टक्केवर पोहचली आहे. भातशेतीसाठी समाधानकारक पाऊस असला तरी करपा रोगाची लागण झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. आतापर्यंत सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 

कणकवली -  जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी गेल्या तीन महिन्यात सरासरी दोन हजार मिलीमीटरचा टप्पा पावसाने गाठला आहे. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने ३५ पैकी १७ धरणांची पातळी शंभर टक्केवर पोहचली आहे. भातशेतीसाठी समाधानकारक पाऊस असला तरी करपा रोगाची लागण झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. आतापर्यंत सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात ८७.०५ टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात ७४.९० तर कोर्लेसातंडी प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणी साठा आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दैनंदीन पर्जन्यमान व पाणीसाठा अहवालातून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसानंतर शेतीच्या कामाला सुरूवात झाली. जुलैअखेर भातशेतीची कामगत पूर्ण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमुग, कुळीद, चवळी या लागवडीला सुरूवात केली. जवळपास भातशेतीची कामगत पूर्ण झाली असून शेतकरी नडणीच्या कामात व्यस्त आहेत. यंदा आतापर्यंततरी समाधानकारक पाऊस असून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत धरणात्या पाणीसाठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. 

राज्यातील धरणांची पातळी ५२ टक्‍क्‍यावर
राज्यातील एकूण ३२४७ धरणामध्ये आज अखेर २८ हजार ८०३ द.ल.घ. मी. इतका पाणीसाठा झाल्याने सरासरी ५२.३१ टक्के इतकी धरणाची पातळी आहे. गतवर्षी हा पाणीसाठा ६१.८७ टक्के इतका होता. आतापर्यंत अमरावती विभागात २१.३८ टक्के कोकण विभाग ८९.५२, नागपूर २०.८५, नाशिक ५८.५३ पुणे ७२.५६ तर मराठवाड्यात २४.७० टक्के इतका पाणीसाठा झाला.

लघुपाटबंधारे प्रकल्पातील साठा टक्क्यांत
शिवडाव १००, नाधवडे १००, ओटव ८८.२१, देदोनवाडी १०.२४, तरंदळे ४८.७५, आडेली १००, आंबोली १००, चोरगेवाडी ७०.४१, हातेरी १००, माडखोल १००, निळेली १००, ओरोसबुद्रुक ५०.२९, सनमटेंब १००, तळेववाडी डिगस ५०.०४, दाबाचीवाडी ७७.०३, पावशी १००, शिरवल १००, पुळास ९८.४७, वाफोली १००, कारिवडे ९५.१६, धामापूर १००, हरकुळ खुर्द १००, ओसरगाव १००, ओझरम ९८.१९, पोईप ६८.५४, शिरगाव १७.८७, तिथवली १००, लोरे १०० टक्के. 

दृिष्टक्षेपात
धरण परिसरात दमदार पाऊस
सिंधुदुर्गात एकूण १६४९८.८ मिलीमीटर पाऊस
जिल्ह्यात सरासरी २०६२.३५ मिलीमीटर पावसाची नोंद
सर्वाधिक पाऊस सावंतवाडीत, २५८२.१ मिलीमीटर 
बुधवारी २४ तासांत झालेला पाऊस 
दोडामार्ग - ०० मिमी. (२२४३ मिलीमीटर)
सावंतवाडी - ०७ मिमी. (२५८२.१ मिलीमीटर)
वेंगुर्ला - १.२ मिमी. (१८२६.१ मिलीमीटर)
कुडाळ - ६ मिमी. (१९६७.७ मिलीमीटर)
मालवण - ० मिमी. (१५५६.४ मिलीमीटर)
कणकवली - १ मिमी. (२५७४ मिलीमीटर)
देवगड - ० मिमी. (१५६० मिलीमीटर)
वैभववाडी - २ मिमी. (१६९८.८ मिलीमीटर)

Web Title: kankavali news sindhudurg dam