परतीच्या प्रवासासाठी एसटी बसला पसंती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

कणकवली - गणेशोत्सव आटोपून मुंबईला परतण्यासाठी चाकरमान्यांकडून प्रामुख्याने रेल्वे आणि खासगी बसेसचा पर्याय निवडला जातो. त्याबरोबरच एस.टी.सेवेलाही चाकरमान्यांनी पसंती दिली आहे. मुंबईला जाणाऱ्या २१५ बसेसचे बुकिंग झाले आहे. यात १ ते ३ सप्टेंबर दरम्यानचे आरक्षण फुल्ल आहे.

पाच आणि सात दिवसांचा गणेशोत्सव आटोपून चाकरमानी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासाठी एस.टी.महामंडळाने सज्जता ठेवली आहे. महामंडळाकडून प्रवासी उपलब्धतेनुसार हंगामी आणि जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याखेरीज मुंबईला जाणाऱ्या नियमित बसेस देखील फुल्ल आहेत. सिंधुदुर्ग एस.टी. विभागाकडे सद्यःस्थितीत २१५ बसेसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मुंबईला जाणाऱ्या बसेसमध्ये सावंतवाडी-बोरिवली, वेंगुर्ले-बोरिवली, कुडाळ-बोरिवली, मालवण-बोरिवली, कणकवली-बोरिवली, फोंडा-बोरिवली, कणकवली-मुंबई, देवगड-बोरिवली, देवगड-नाटे-बोरिवली आदी गाड्यांचा समावेश आहे.

यंदा मुंबईहून सिंधुदुर्गकडे २५० एसटी बसेसमधून चाकरमानी दाखल झाले होते. या बसेस आता मुंबईला रवाना केल्या जात आहेत. दरम्यान ज्या ठिकाणाहून पूर्ण क्षमतेने प्रवासी उपलब्ध होतील, तेथून थेट मुंबईसाठी जादा बसेस सोडण्याचेही नियोजन एस.टी.प्रशासनाने केले आहे. सध्या १ ते ३ सप्टेंबर या दरम्यान मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. 

एसटी महामंडळाकडून जादा गाड्यांबरोबरच देवगड-मुंबई, कणकवली-बोरिवली, मुंबई-विजयदुर्ग, सावंतवाडी-बोरिवली, कणकवली-बोरिवली, कणकवली-ठाणे या मार्गावर आणखी नियमित व जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

Web Title: kankavali news st bus