कणकवलीत ८८६ कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

कणकवली - तालुक्‍यातील १०५ महसुली गावांत १२६ मतदान केंद्रांवर उद्या (ता. २१) होणाऱ्या मतदानासाठी ८८६ कर्मचारी साहित्यासह आज नेमून दिलेल्या केंद्रांवर रवाना झाले. कलमठ मतदारसंघातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कणकवली तालुक्‍यातील ६३ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हे मतदान होत असून, एकूण ९८ हजार ७४९ मतदार मतदान करणार आहेत. प्रत्येक केंद्रावर गट आणि गणासाठी स्वतंत्र वोटिंग मशीन तसेच जादा मशीन तैनात ठेवण्यात आली आहेत. केंद्रनिहाय ५ कर्मचारी, १६ झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत.

कणकवली - तालुक्‍यातील १०५ महसुली गावांत १२६ मतदान केंद्रांवर उद्या (ता. २१) होणाऱ्या मतदानासाठी ८८६ कर्मचारी साहित्यासह आज नेमून दिलेल्या केंद्रांवर रवाना झाले. कलमठ मतदारसंघातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कणकवली तालुक्‍यातील ६३ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हे मतदान होत असून, एकूण ९८ हजार ७४९ मतदार मतदान करणार आहेत. प्रत्येक केंद्रावर गट आणि गणासाठी स्वतंत्र वोटिंग मशीन तसेच जादा मशीन तैनात ठेवण्यात आली आहेत. केंद्रनिहाय ५ कर्मचारी, १६ झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना १४ एसटी आणि २ जीपच्या माध्यमातून आज नेमलेल्या गावामध्ये सोडण्यात आले. मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रत्येक केंद्रावर एक पोलिस तसेच होमगार्ड तैनात असतील. तालुक्‍यात ३ पोलिस अधिकारी, १३९ पोलिस कर्मचारी, ३३ होमगार्ड तसेच तालुक्‍यासाठी ९० पोलिस कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले आहेत. उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, निवडणूक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ओळखपत्र नसल्यास आधार कार्ड व अन्य निश्‍चित केलेले पुरावे सादर केल्याशिवाय मतदान करता येणार नाही. मतदार यादीतील आपला क्रमांक केंद्रावरील मतदान यादीत मिळणार आहे.

Web Title: Kankavli 886 employees