कणकवली नगरपंचायतीतर्फे ९५ टक्‍के मालमत्ता करवसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली नगरपंचायत

कणकवली नगरपंचायतीतर्फे ९५ टक्‍के मालमत्ता करवसुली

कणकवली : गेल्‍या आर्थिक वर्षात नगरपंचायतीने ९४.८५ टक्‍के मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्‍ट पूर्ण केले आहे; तर पाणीपट्टीची केवळ ६० टक्‍के वसुली झाली. मेअखेरपर्यंत उर्वरित घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल होण्याची अपेक्षा नगरपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. दरम्‍यान, करवसुलीसाठी नुकतेच शहरातील मालमत्तांचेही नव्याने सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरात एकूण सात हजार ४०० मालमत्ता आढळल्‍या आहेत.

जिल्ह्यातील मालवण शहर तसेच अन्य काही भागात मालमत्ता कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करावी लागली होती. सुदैवाने कणकवली शहरातील सुमारे ९५ टक्‍के मालमत्तांची कर वसुली झाली. गेल्‍या आर्थिक वर्षात नगरपंचायतीला एक कोटी १४ लाख रुपये मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्‍ट होते. यातील एक कोटी आठ लाखांची वसुली झाली आहे. दरम्‍यान, शहरात एक हजार ५७४ नळ ग्राहक आहेत. त्‍यांच्याकडून गेल्‍या आर्थिक वर्षात १९ लाख ६९ हजार पाणीपट्टी वसूलीचे उद्दिष्‍ट होते; मात्र मार्च अखेरपर्यंत ११ लाख ७४ हजार एवढी पाणीपट्टी वसुली झाली आहे. पाणीपट्टीचीही पूर्ण वसूली मेअखेरपर्यंत होण्याची शक्‍यता नगरपंचायतीकडून व्यक्‍त करण्यात आली. कणकवलीचा नवा विकास आराखडा सध्या तयार केला जात आहे. त्‍याअनुषंगाने नुकतेच शहरातील सर्व मालमत्तांचेही सर्वेक्षण झाले. यात सात हजार ४०० मालमत्ता आढळल्‍या आहेत. यावर कर आकारणी होईल, अशी माहिती नगरपंचायतीने दिली.

तालुक्यातील काही रहिवासी राज्‍याच्या इतर भागांत कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. त्यांनी मेमध्ये गावी आल्‍यावर मालमत्ता कर भरण्याचे कळविले आहे. त्‍यामुळे मेअखेरपर्यंत संपूर्ण मालमत्ता कराची वसुली होईल.

- मनोज धुमाळे, करवसुली अधिकारी, नगरपंचायत

Web Title: Kankavli Nagar Panchayat Collects 95 Property Tax

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..