Photo : रत्नागिरीत 'या' किनार्‍यावर आहेत नयनरम्य तिन गावे : तुम्ही पाहिली आहेत का...?

राजेश कळंबट्टे
Friday, 11 September 2020

पर्यटकांना  आकर्षीत करणारी तीन गावे

रत्नागिरी : निसर्गाने नटलेली अनेक गावे नद्या, खाड्या, समुद्राच्या किनार्‍यावर वसलेली आहेत. त्यांची विविध वैशिष्ठ्ये आहेत. ही गावे पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करणारी आहेत. रत्नागिरी तालुक्यात काजळी खाडीच्या किनार्‍यावरील कर्ला, जुवे, आंबेशेत ही तिन गावे अशीच पर्यटकांचे मन लुभावणारी आहेत. या गावांची वैशिष्ठ्य येथील रहिवाशी राजीव लिमये यांच्या माध्यमातून सकाळच्या वाचकांना उपलब्ध करुन दिली आहेत.

रत्नागिरी शहरी भागापेक्षा कर्ला गावाचे तपमान दोन तीन डिग्रीने कमी आणि सुखद असते. काजळी खाडीला येणार्‍या भरती ओहोटीने समोरचं दृश्य सतत बदलत असल्यासारखं दिसते. एखाद्या चित्रपटातील बदलती दृश्य मनमोहून टाकणारी आहेत. ओहोटी लागली की खाडीची काळीकरंद माती उघडी पडते. त्याचवेळी समोरच्या गाळाने तयार झालेल्या छोट्या बेटावर जमीनीत दडलेले कालवे मुळे काढण्यासाठी महिला वर्ग एकत्र येतात. समोरच्या चिपीची तिवरांची जमीनीतूनवर आलेली मुळे श्वास घेउन ताजीतवानी झालेली असतात.

या चिपींमध्ये हजारो पक्षांची घरटीही आहेत. सकाळी आणि संध्याकाळी हजारो ‘बलाक माला’ आकाशात भरारी घेताना दिसतात. त्यात कावळेही असतातच. भरतीचे पाणी अलगद वाढत या सर्वांना अलगद कवेत घेते आणि खाडी पुन्हा निळीशर होऊन जाते. मच्छीमारांच्या छोट्या होड्या, लाँचीस पाण्यावरुन प्रवास करण्याची मजा काही औरच असते.

हेही वाचा- ऑनलाईनचा डाव ठरला भारी़, बीओटी काॅम्प्लेक्सला खडाजंगीत घेतली मंजुरी, कोकणातील कुठल्या पालिकेत घडला प्रकार
साधारण पन्नास वर्षांपर्यंत ही खाडी म्हणजे एक जलमार्गच होती. कौलांची आणि इतर माल वहातूक करणारी जहाजे पार आत हरचेरीपर्यंत येत असल्याचे दाखले येथील जुने रहिवासी देतात. मात्र आता भरलेल्या गाळाने ते दुरापास्त झाले आहेत. रात्री समोरच्या भगवती किल्ल्यावरच्या लाईट हाउसचा दिवा फिरत फिरत अवघ्या रत्नागिरीकरांना जागते रहो चा संदेश असतो. उत्तरेला टेकडीवर रत्नागिरी शहराचे दिवे खुणावतात. थिबा पॉईंटवरून कर्ले गावाचे विहंगम विलोभनीय दृश्य भुरळ घालते.

समोरच्या बेटावरची चिपीची झाडे पूर्वी तेवढी उंच नव्हती अगदी भाट्याचा पूलही काठावरून दिसायची. नव्यानेच झालेल्या दोन जेट्टी वर पोचलं की हे दृष्य जवळून पहाता येते. गावामध्ये मच्छीमार आणि शेतक-यांची पारंपारिक वस्ती असून प्रारंभीच असलेले हनुमान मंदिर, सुंदर असे लक्ष्मीकेशव मंदिर , एक दत्त मंदिर अणि खाडीकाठावरच्या दोन नोतनीकरण केलेल्या भव्य मशिदीचे मिनार गावाची शोभा वाढवितात. या सुंदर खाडीची साथ एकटेपणा दूर करते. अशा या काजळी नदीच्या म्हणजेच भाट्याच्या खाडीच्या काठावर वेळ कसा जातो हे कळतच नाही.

हेही वाचा- महाराष्ट्रात ब्लॅकमॅजीकसाठी या प्राण्याला आहे मोठी मागणी ; होतेय लाखाची उलाढाल
कर्ला गावाला जोडूनच टुमदार जुवे गांव खाडीच्या काठावर वसलेले आहे. तीनही बाजूनी पाणी आणि पाठीमागे डोंगर रांगा अशी त्याची ख्याती आहे. जुवेच्या शेजारी वसलेले आंबेशेत गाव. हा तीनही गावांचा परिसर भौगोलिकदृष्ट्या तसा एकसंधच आहे.
जुवे हे छोटेसे टुमदार गांव. पूर्वी जुवे गावात होडीने जावे लागायचे. एका टोकाला दत्तमंदिर. मंदिराचे आसपास पारंपारिक चुन्याच्या भट्ट्या तुमचे लक्ष वेधून घेतात. खाडीतील शिंपले भाजून त्यापासून हा चुना शेकडो वर्षे तयार केला जात आहे.

 

गाव नारळीच्या झाडांनी भरलेले आहे. मागच्या बाजूच्या डोंगरावर जुवे वासियांच्या आंब्यांच्या बागा आहेत. त्यावरचा सडा परिसर अविकसित आहे. रमणीय आंबेशेत आंब्याच्या बागाने वेढलेले आहे. आंबेशेत गावातून नाचणे देवीचे देवळापर्यंत एक गर्द झाडीतून जाणारा पक्का डांबरी रस्ता आहे. आंबेशेत गावात विठ्ठल रखुमाईचे एक जुने मंदिर आहे. गावाचे बौद्ध वाडीत एक बुद्ध विहारही आहे. पौर्णिमेच्या चांदण्या रात्री हा निसर्गरम्य परिसत फिरण्याचा आनंद काही वेगळाच आहे. पर्यटकांसाठी याठिकाणी बोट सफरीचीही व्यवस्था केली आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karla Juve and Ambeshet are the three villages on the banks of Kajali Bay in Ratnagiri taluka