कर्नाटकी मिरची बाजारात दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

सावंतवाडी - रब्बी हंगामात लागवड केलेली मिरची अद्यापही बाजारात आलेली नाही. पावसाळ्याआधी जिल्ह्यात मसाले तयार करण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच कर्नाटकी मिरचीची दुकाने लावली आहेत. दरम्यान, ही मिरची खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

सावंतवाडी - रब्बी हंगामात लागवड केलेली मिरची अद्यापही बाजारात आलेली नाही. पावसाळ्याआधी जिल्ह्यात मसाले तयार करण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच कर्नाटकी मिरचीची दुकाने लावली आहेत. दरम्यान, ही मिरची खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

पावसाळ्याच्या सुरवातीला जिल्हावासीय वर्षभराची, तर काही जण सहा महिन्यांसाठी घरगुती मसाले बनविण्याची तयारी करतात. यासाठी मसाल्याचे लागणारे साहित्य शहरातील बाजारपेठात दाखल होतात. रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले मिरचीचे पीक चांगल्या प्रकारे आलेले नाही. त्यामुळे अजून काही कालावधीनंतर बाजारात पुरेशी गावठी मिरची यायला वेळ लागणार आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात कर्नाटकी मिरचीची विक्री करण्यासाठी विक्रीदार येत आहेत. जिल्ह्यात ज्या ठिकाणी वाहने व माणसांची ये-जा करण्याची वर्दळ असते, त्या ठिकाणी ही दुकाने लावण्यात आलेली आहेत. 

स्थानिक बाजारपेठातही कर्नाटकी मिरचीची दुकाने लागली आहेत. मिरचीचा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो आहे. यात चांगल्या प्रतीच्या मिरचीचा दर प्रतिकिलो ९० आणि १०० रुपये असा रुपये असा विक्री दर ठेवला आहे. 

कर्नाटकातील हुबळी, बेळगाव व तेथील काही भागातून हे विक्रेते कर्नाटकी मिरची घेऊन आपल्या वाहनांसोबत दाखल झाले आहेत. यातून दिवसाला हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. गावठी मिरचीचा दर या कर्नाटकी मिरचीच्या दरापेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे बरेच ग्राहक कर्नाटकी मिरचीची खरेदीला पसंती देत आहे.

Web Title: karnataki Chili in the market