काश्‍मिरी तरुणांना कोकण भावले; समुद्रावर खूश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - भारताचे नंदनवन जम्मू-काश्‍मीर. गेली काही वर्षे दहशतवादी कारवायांमुळे काश्‍मीर त्रस्त आहे. यामुळे अनेकांनी काश्‍मीर सोडले. सीमेवर आतंकवादी हल्ले होत असूनही तेथे भारतीयत्व टिकवणारे देशभक्त भारतीयही आहेत. अशा काही सरपंचांचा सत्कार असीम फाउंडेशनने पुण्यात केला. स्वयंरोजगार करणारे काही काश्‍मिरी तरुण या कार्यक्रमात सहभागी झाले. कधीही समुद्र न पाहिल्याने या तरुणांनी रत्नागिरीत समुद्रदर्शन घेतले. कोकणचे हिरवाई, निसर्गसौंदर्य पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.

असीम फाउंडेशनचे सदस्य दीप बांदिवडेकर व संजीवकुमार बर्वे यांच्यामुळे त्यांना रत्नागिरीची सैर करता आली. पुण्यातील असीम फाउंडेशनने टिळक स्मारकमध्ये परमवीरचक्र विजेते संजयकुमार यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बांदिवडेकर व बर्वे यांनी सहभाग घेतला होता. असीम फाउंडेशनच्या कार्यक्रमात दहशतवाद्यांना न जुमानता भारताच्या बाजूने उभे असणाऱ्या काश्‍मीरमधील दहा गावांतील सरपंचांचा सत्कार करण्यात आला. हे सर्व सरपंच काश्‍मिरी तरुणांपुढे राष्ट्रभक्तीचा आदर्श ठेवत आहेत. त्यांना दिशा देत आहेत. चुकीच्या मार्गाकडे जाण्यापासून त्यांना रोखून भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत. याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नादी न लागता मुश्‍ताक अहमद तेही, जाफर हुसेन मीर, मुश्‍ताक अहमद भट, हिलाल अहमद या वय २५ ते ३० वयोगटातीलील तरुणांना असीम फाउंडेशनने दिशा दिली. फाउंडेशनच्या मदतीने ते बेकरीचा व्यवसाय करू लागले आहेत. सफरचंद, अक्रोड वापरून पदार्थ तयार करणे, बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय ते करीत आहेत. या कार्यक्रमाकरिता काश्‍मीरमधून आलेल्या मुश्‍ताक अहमद तेही, जाफर हुसेन मीर, मुश्‍ताक अहमद भट, हिलाल अहमद आदींनी समुद्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

आजवर समुद्र पाहिला नाही
भारत-पाक सीमेवर बंदिपुरा, बडगम, पंपोर, बारामुल्ला या अतिसंवेदनशील जिल्ह्यांतील हे तरुण आहेत. त्यांनी कधीही समुद्र पाहिलेला नाही, त्यामुळे ते रत्नागिरीत दाखल झाले. रत्नागिरीत त्यांचे झालेले स्वागत पाहून ते आनंदले. आदरातिथ्य पाहून भारावले. रत्नागिरी, आरे-वारे, जयगड, भाट्ये या समुद्रकिनाऱ्यांवर त्यांनी सैर केली. रत्नागिरीतला निसर्ग, हिरवळ पाहून ते खूश झाले. पुन्हा काश्‍मिरींसोबत कोकणात येऊ, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Kashmiri youths