केसरी मायनिंग प्रस्ताव ‘वन’ने फेटाळला : समाधान चव्हाण

अमोल टेंबकर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभागाच्या क्षेत्रात सद्यस्थितीत मायनिंगचा एकही प्रस्ताव प्रस्तावित नाही. केसरी फणसवडे येथील प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे, अशी माहिती येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी आज येथे दिली.

आंबोली घाटाला पर्याय ठरणार्‍या दाणोली केसरी फणसवडे चौकुळ या रस्त्याला पर्यायी जमिन मिळण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव अद्याप पर्यंत शासनाकडे किंवा वनमंत्रालयाकडे बांधकाम विभागाने सादर केलेला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चव्हाण म्हणाले, “सावंतवाडी दोडामार्ग भागात काही मायनिंग प्रस्तावित होते; मात्र त्यात केसरी फणसवडेसह झोळंबे, असनिये आदी गावांचा समावेश होता; मात्र सद्यस्थितीत वनविभागाच्या जमिनी किंवा वनसंज्ञा आणि वनजमिन असलेल्या एकाही ठिकाणी असा कोणताही मायनिंगचा प्रस्ताव प्रलंबित असल्याची नोंद आपल्याकडे नाही. तर केसरी फणसवडेचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा ही प्रश्‍न येत नाही.” 

चव्हाण पुढे म्हणाले, “सावंतवाडी आंबोलीला पर्यायी रस्त्याचे काम होणे गरजेचे होते. त्यासाठी मोर्ले पारगड या रस्त्यासाठी वनविभागाची जागा देण्याबाबत जसा प्रस्ताव झाला तसा प्रस्ताव होणे गरजेचे होते; मात्र या रस्त्यासाठी बांधकाम विभागाकडून आवश्यक असलेला प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही.”

मळगाव घाटीतील झाडांची बांधकामची जबाबदारी

यावेळी मळगाव ग्रामस्थांच्या वतीने माजी सभापती राजू परब यांनी घाटातील धोकादायक झाडे तोडण्यात यावीत. अन्यथा आंदोलन करू असा इशारा देणारे निवेदन चव्हाण यांना दिले. याला अनुसरून झाडे तोडण्याचे काम आमचे नाही. ती जबाबदारी बांधकामची आहे. त्यांना तसे पत्र दिले आहे. समिती नेमून त्यांनी पुढील भूमिका घ्यायची आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Kesari Mining Proposal Rejected by Forest Dept says Chavan