बाबासाहेबांचे चरित्र लिहिणारा खरवते गावचा सुपुत्र
राजापूर - तालुक्यातील खरवते गावचे सुपुुत्र तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी डॉ. आंबेडकर यांचे पहिले चरित्र मराठीत लिहून त्यांचे पहिले चरित्रकार बनण्याचा मान मिळवला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी त्यांनी १९४३ मध्ये हे चरित्र लेखन केले. त्याचे पुनर्मुद्रण झाले आहे.

देश स्वतंत्र होण्यापूर्वी श्री. खरावतेकर या सुपुत्राने कराचीमध्ये वास्तव्यास असताना बाबासाहेबांचे चरित्र लिहिल्याची माहिती जाधव यांना मिळाली. मुंबई विद्यापीठाचे कोकणातील इतिहास विषय घेऊन डॉ. आंबेडकरांनंतरचे पहिले पदवीधर म्हणून खरावतेकर यांची ओळख आहे. अभ्यासपूर्ण लेखन केलेले ‘डॉ. आंबेडकर’ हे पुस्तक त्यावेळी कराची येथून प्रसिद्ध झाले होते. मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरम या व्यासपीठाअंतर्गत ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने पुस्तकाचे पुनर्मुद्रण केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेल्या तानाजी खरावतेकर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर पहिले चरित्र लिहिले असले, तरी त्यांची फारशी माहिती कोणाला नाही. ती साऱ्यांना व्हावी म्हणून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि सफाई कामगार परिवर्तन संघाने गावात मोफत दिली. खरवते गावामध्ये तानाजी खरावतेकर यांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.