esakal | Khed : चाकरमान्यांना अडथळ्यांचे विघ्न
sakal

बोलून बातमी शोधा

khed

Khed : चाकरमान्यांना अडथळ्यांचे विघ्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची महामार्गावर एकच गर्दी झाली आहे. गणेशभक्त मिळेल, त्या वाहनाने आपल्या गावी निघाले आहेत. महामार्गावरील भरणे नाका व दाभीळनजीक बायपास रस्त्याच्या पुलाचे काम सुरू असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, तुटलेल्या साईडपट्ट्या, पावसामुळे या मार्गावर साचलेला चिखल, अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत असलेले रस्त्याचे काम या विविध अडचणींना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

खेड तालुक्याच्या हद्दीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटरच्या रस्त्याचे काम कल्याण टोलवेज इंफ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे. ४४ किलोमीटरच्या अंतरात अन्य ठिकाणी चौपदरीकरणाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे; मात्र भरणे नाका आणि दाभीळ येथील कामालाच ग्रहण लागले आहे. गेले काही महिने या ठिकाणी रात्रंदिवस उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने भरणे नाका व दाभीळ परिसरात कोंडी होऊ लागली आहे.

एक दृष्टिक्षेप

  1. भरणे नाका, दाभीळनजीक बायपास रस्ते पुलाचे काम सुरू

  2. महामार्गावर खड्डे, तुटलेल्या साईडपट्ट्या, साचला चिखल

  3. खेड तालुक्याच्या हद्दीत चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू

  4. कशेडी-पशुराम घाट दरम्यानच्या ४४ कि. मी. चे काम

  5. भरणे नाका व दाभीळ येथील कामालाच लागले ग्रहण

ठेकेदाराला सूचना करण्याची मागणी

भरणे नाका आणि दाभीळ नाका हा परिसर नेहमीच पादचाऱ्यांनी गजबजलेला असतो. याच ठिकाणांहून महामार्गावरील हजारो वाहने धावत असतात. उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम आणि पुलाच्या जोडरस्त्यावर पडलेले खड्डे, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला योग्य त्या सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

वाहतुकीचा बोजवारा

गेल्या वर्षी भरणे नाका येथे भुयारी मार्गासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. त्यामुळे भरणे नाका परिसरात वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला होता. काही महिन्यांनंतर ठेकेदाराने खोदलेला खड्डा भरण्यास सुरवात केली. त्यामुळे अनेकांना महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात नेमकं काय चाललं आहे? असा प्रश्न पडला. नंतर कळलं की आता भुयारी मार्ग रद्द करून या ठिकाणी उड्डाणपूल बांधला जाणार आहे.

एक नजर

  • मिळेल त्या वाहनाने गणेशभक्त गावी

  • भरणे, दाभीळनजीक वाहतूक कोंडी

  • बायपास रस्त्याच्या पुलाचे काम सुरू

  • तुटलेल्या साईडपट्ट्या, चिखलाचे साम्राज्य

  • अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट

loading image
go to top