खोपोली पालिकेचे एक पाऊल पुढे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

खोपोली - महात्मा गांधी स्वच्छता अभियान आणि नगरविकास मंत्रालयाच्या वतीने गेल्या वर्षी शहरांसाठी राबवण्यात आलेल्या हागणदारीमुक्त विशेष कार्यक्रमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते खोपोली नगरपालिकेला प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. यात मागेल त्या कुटुंबाला शौचालय देणे, सार्वजनिक शौचालयाची संख्या वाढवणे, त्यांची सुधारणा करणे, झोपडपट्टीत या योजनेला अधिक प्राधान्य आदींचा या उपक्रमात समावेश होता. 

केंद्र व राज्याच्या योजनांचा फायदा घेत खोपोली नगरपालिकेने वर्षभर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवली. यात वर्षभरात झोपडपट्टीत तीन हजार खासगी शौचालये बांधून सार्वजनिक शौचालयांच्या संख्येत वाढ केली. नागरिकांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये यासाठी जनजागृती केली. याची दखल घेऊन केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नगरपालिकेचा गौरव केला. या योजनेत हागणदारीमुक्त व कचरामुक्त शहराला केंद्र सरकारकडून दोन कोटींचा जादा विकास निधी देण्याची तरतूद आहे. याचा फायदा शहराला होणार आहे. नगरपालिकेच्या वतीने मावळते नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, नवनियुक्त नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष रमेश जाधव, मुख्याधिकारी दीपक सावंत यांनी नायडू यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र स्वीकारले.

सारेच काही आलबेल
‘हागणदारीमुक्त खोपोली शहर’ असा दावा नगरपालिकेने केला असला, तरी प्रत्यक्षात मात्र येथे वेगळीच परिस्थिती आहे. नगरपालिका कार्यालयापासून विविध झोपडपट्ट्यांच्या शेजारची मैदाने, रेल्वेस्थानकानजीकची मोकळी जागा आणि शहराच्या मध्य भागातून वाहणारा नाला येथे नागरिक नेहमी मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचाला बसलेले असतात. यात बांधकाम मजुरांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे कचरा व्यवस्थापन, डास निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापनाबाबत अनेक त्रुटी आहेत. ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी चार-पाच महिन्यांत सर्वसाधारण सभांमध्ये पालिकेचे पितळ उघडे पाडले आहे. विशेष म्हणजे त्यानंतरही कोणत्या आधारावर ही निवड झाली याचे गौडबंगाल कुणालाच कळलेले नाही.

Web Title: Khopoli - Mahatma Gandhi sanitation campaign