टोल बंद होताच दुरुस्तीची टोलवाटोलवी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

खोपोली - खासगीकरणातून तयार करण्यात आलेल्या खोपोली-पेण रस्त्याची पावसाने दैना केली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील टोल बंद केल्याने दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

२७ किलोमीटरचा हा रस्ता ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बांधण्यात आला. दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी जे. एम. म्हात्रे एन्फ्राप्रोजेक्‍ट या कंपनीकडे होती. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टोलआकारणीचे कामही याच कंपनीकडे होते; मात्र सरकारने १ जून २०१५ रोजी या रस्त्यावरील टोल बंद केल्याने म्हात्रे कंपनीकडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यानंतर देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. आता तर प्रवास धोकादायक झाला आहे.

आंदोलनाचा इशारा 
टोल सुरू असताना या रस्त्याची दुरुस्ती वेळेवर होत होती. रायगड जिल्ह्यातील सुस्थितीत असलेला एकमेव रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख होती. टोल बंद झाल्यानंतर खड्डे भरण्याचे सौजन्यही बांधकाम विभाग दाखवत नाही. किमान खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून न झाल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा ‘टेम्पो व सिक्‍स सीटर रिक्षा चालक-मालक युनियन’ने इशारा दिला आहे.

Web Title: khopoli news toll road