‘त्या’ हल्ल्याबाबत धक्‍कादायक धागेदोरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कुडाळ येथील अनुराधा तळेकर (वय ६३) यांच्यावर शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेआठच्या सुमारास येथील मराठा मंडळाच्या मागील बाजूस ओहोळात संशयित आरोपीने चोरीच्या इराद्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. चार दिवसांनंतर त्यांची प्रकृती सुधारली असून, पोलिसांनी पुन्हा एकदा जबाब नोंदविला आहे. जबाबात काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

कणकवली - कुडाळ येथील त्या ज्येष्ठ महिलेवर संशयिताने चाकू हल्ला करण्यामागे वेगळे कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे.  ‘त्या’ महिलेच्या जबाबात काही धक्‍कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्या आधारे तपास सुरू केला आहे. महिलेकडून संशयिताबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने संशयिताला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.  

कुडाळ येथील अनुराधा तळेकर (वय ६३) यांच्यावर शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेआठच्या सुमारास येथील मराठा मंडळाच्या मागील बाजूस ओहोळात संशयित आरोपीने चोरीच्या इराद्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. चार दिवसांनंतर त्यांची प्रकृती सुधारली असून, पोलिसांनी पुन्हा एकदा जबाब नोंदविला आहे. जबाबात काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

संशयिताने त्यांना वागदे येथून मराठा मंडळापर्यंत चालतच एसटी बसस्थानकाकडे आणण्यासाठी प्रयत्न केला. तेथून जवळच्या रस्त्याने नेतो, असे सांगून ओहोळात नेले. तेथे या दोघांमध्ये झटापट झाली; मात्र या हल्ल्यामागे वेगळे कारण असल्याचे तपासात पुढे येत आहे. संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या मोबाईलवरून कणकवली परिसरातच गेले दोन दिवस लोकेशन मिळत होते. आता हा मोबाईल बंद झालेला आहे. तसेच त्या महिलेकडून संशयित आरोपीची माहिती विसंगत मिळत आहे.

पथक तैनात
पोलिसांनी हिट लिस्टवरील संशयितांची छायाचित्रे त्या महिलेला दाखविली. परंतु, ओळख पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे आहे. तपासाच्या माहितीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी कणकवली पोलिस ठाण्यास आज भेट दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषणचे एक पथक सातत्याने संशयिताच्या शोधासाठी प्रयत्नशील आहे.

Web Title: Knife attack on old woman follow up