कणकवलीत महिलेवर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

कणकवली - शहरातील मराठा मंडळ रोडवर एक महिलेवर अज्ञाताने चाकू हल्ला करून तिची पर्स लांबवली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला. अनुराधा बाळकृष्ण तळेकर (वय ६३, रा. कुडाळ) असे त्यांचे नाव आहे. 

शहरात नातेवाइकांकडे आलेल्या तळेकर यांनी सायंकाळी वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्या गोपुरी आश्रमासमोरील पेट्रोलपंपालगत कुडाळला जाणाऱ्या एसटी बसची वाट पाहत थांबल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास तेथे एक तरुण आला. त्याने महिलेला इथे बस मिळणार नाही, तुम्हाला बस स्थानकात सोडतो, असे सांगितले. त्यानंतर तो त्यांना गोपुरी आश्रमालगतच्या मराठा मंडळ बंधाऱ्यावरून कणकवलीच्या दिशेने घेऊन आला.

बंधारा संपल्यानंतर त्या युवकाने चाकू काढला आणि पर्सची मागणी केली. नकार देताच त्याने तळेकर यांच्या चेहऱ्यावर चाकूचे चार ते पाच वार केले आणि पर्स लांबवून तो फरार झाला.
चाकू हल्ला होताना त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे तेथील लोक जमा झाले. यातील एका नागरिकाने नगराध्यक्ष समीर नलावडे यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. काही वेळात तेथे नलावडे आणि सहकारी आले. त्यांनी जखमी महिलेला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Web Title: knife attack on woman in Kankavali