कोकण कृषी विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदी डॉ. संजय सावंत

कोकण कृषी विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदी डॉ. संजय सावंत

दाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचे (पुणे) संचालक डॉ. संजय सावंत यांची नियुक्‍ती करण्यात आली. डॉ. सावंत सोमवारी (ता. ११) कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. 

डॉ. संजय दीनानाथ सावंत यांनी, दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठामधून १९७८ मध्ये बी.एस्सी. (कृषी) केले. राहुरी कृषी विद्यापीठामधून १९८० मध्ये एम.एस्सी, तर १९८६ मध्ये जी. बी. पंत कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ पंतनगर (उत्तराखंड) येथून पीएच.डी. केली. १९९६ मध्ये कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी (पुणे) येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सेवेस सुरवात केली. १ जून २०१३ रोजी त्यांची याच संशोधन केंद्रात संचालक म्हणून बढती देण्यात आली. 

कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी मुदत संपण्याअगोदर १ जून २०१८ रोजी कुलगुरुपदाचा राजीनामा दिला होता. ३१ जुलै १८ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्याकडे कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. कुलगुरू निवडीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू शोध समितीने ११ जणांना मुलाखतीसाठी बोलावले.

अंतिम पाचातून निवड
कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, मांजरी (पुणे) येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. संजय सावंत व कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान माळेगाव (बारामती) या संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र प्रताप सिंग या पाच जणांची नावे बंद लिफाफ्यातून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com