esakal | Kokan: चिपी विमानतळाचे श्रेय भाजप व माझे : नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

नारायण राणे
चिपी विमानतळाचे श्रेय भाजप व माझे : नारायण राणे

चिपी विमानतळाचे श्रेय भाजप व माझे : नारायण राणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘चिपी विमानतळाचे सर्व श्रेय भाजप व आमचे आहे. उद्‍घाटनासाठी पाहुणे म्हणून बोलावले आहेत.आपल्याकडे असलेल्या पदाप्रमाणे काहीतरी देऊन जा!,’’ असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मारला.

चिपी विमानतळाचे उद्‍घाटन शनिवारी (ता.९) होणार आहे.या निमित्ताने या विमानतळाच्या श्रेयावरून वाद पेटला आहे. याबाबत भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी चिपी निमानतळासाठी कोणी मेहनत घेतली आणि त्याचे श्रेय कोण घेत आहेत यावर भाष्य करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली.

‘‘चिपी विमानतळाच्या सर्व परवानग्या मी महसूलमंत्री असताना घेतल्या असे सांगून राणे म्हणाले की त्यावेळचे नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन विमानतळाची परवानगी घेतली. त्यानंतर २०१४ पर्यंत विमानतळाचे सर्व काम पूर्ण झाले, तरीही आम्हीच विमानतळाचे काम पूर्ण केले असे हे म्हणतात. यांचा म्हणजे शिवसेनेचा खोटारडेपणा मी उद्याच्या उद्‍घाटन कार्यक्रमात व्यासपीठावरून सांगणार,’’ असेही राणे म्हणाले.

ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, मी थेट बोलणारा माणूस आहे. नुसते पद असून

उपयोग नाही. या माणसाची लायकी नाही. ही उद्‍घाटन पत्रिका छापली आहे, यात माझे नाव अत्यंत छोट्या अक्षरात प्रसिद्ध केले आहे. इतका कमीपणा करू नये. मुख्यमंत्री आहात. पाहुणे म्हणून येणार आहात तर पाहुण्यासारखे राहा. पाहुणचार करून पाठवू, असेही सांगायला ते विसरले नाहीत.

मागण्या पूर्ण झाल्यावरच विकासाची कामे

शिवसेनेचे नेते पदाधिकारी हे ठेकेदाराकडून चारचाक्या गाड्या घेतात. तसेच आणखी काही गोष्टींची मागणी करतात. त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यावरच रस्त्यांची, विकासाची कामे सुरू होतात. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. खासगीत सांगतो, असेही राणे यांनी पत्रकार परिषदेत म्‍हणाले.

loading image
go to top