कोकणात का लागतात वणवे? त्यामागील कारणे

कोकणात का लागतात वणवे? त्यामागील कारणे

राजापूर (रत्नागिरी): विविध नैसर्गिक साधन संपदेने नटलेल्या कोकणचा वारसा रत्नागिरी जिल्ह्याला (Ratnagiri District)लाभला आहे. विविध जातीच्या दुर्मिळ वनस्पतींसह वन्यप्राण्यांचे या जंगलराजीमध्ये (Forest Wildlife)वास्तव्य आहे. रत्नागिरी जिल्ह्याला राज्य शासनाने फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. त्याचा लाभ घेत येथील शेतकऱ्यांनी (Farmer)मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळी यांच्या बागा (Orchards, Mango, Cashew, Coconut)विकसित केल्या आहेत. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात विविध जातींच्या झाडांची कोकणामध्ये लागवड होत आहे.

मात्र उन्हाळ्यामध्ये विविध कारणांनी लागणाऱ्या वणव्यांमध्ये बागायतींचे मोठे नुकसान होत आहे. विकसित केलेल्या बागा जळून शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र त्याची नुकसान भरपाई देण्यात शासनाकडून हात आखडता घेतला जातो. त्यामुळे वणव्यामध्ये बागायतदारांच्या स्वप्नाची राखरांगोळी होत आहे.

kokan farm and Garden fire reasons kokan marathi news

असे लागतात वणवे

पोषक असलेल्या हवामान आणि जमिनीचा आधार घेत येथील अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या बागा विकसित केल्या आहेत. या बागांमधील झाडांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित शेतकऱ्यांकडून या बागेच्या कपाउंडच्या बाहेरून (या प्रकाराला काही भागामध्ये "ईत' काढणे असे म्हणतात.) जाणूनबुजून आग लावली जाते. लावण्यात आलेली आग काहीवेळा आटोक्‍यात राहत नसल्याने तिचा भडका उडून वणवा पसरतो. जनावरांना वैरण वा अन्य काही कारणांसाठी आवश्‍यक असलेले गवत काढून झाल्यानंतर सडा मोकळा करण्याच्या उद्देशाने काहीवेळा सड्यावरील गवत जाळले जाते. त्यासाठीही आग लावली जाते तर, काहीवेळा काही लोक जाणूनबुजून वणवे लावतात.

वन्यजीव, दुर्मिळ वनस्पती होतात नष्ट

सह्याद्रीच्या रांगांमध्ये विविध दुर्मिळ वनस्पती आणि वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. विशिष्ट हंगामामध्ये अन्य भागातील वन्यजीव सह्याद्रीच्या रांगातील घनदाट जंगलामध्ये स्थलांतर करून आश्रयाला येतात. अचानकपणे लागणाऱ्या या वणव्यामध्ये मोठमोठी विस्तारित असलेली जंगलेच्या जंगले जळून नष्ट होतात. त्यामध्ये दुर्मिळ झाडे आणि छोटे-मोठे वन्यप्राणीही जळून मरून जातात. या वणव्यांमध्ये जंगलेच नष्ट होत असल्याने वन्यजीवांच्या आश्रयस्थानालाच धोका निर्माण होतो.

बागांना अधिक धोका

बहुतांश शेतकऱ्यांच्या बागा घरापासून काही किमी दूर अंतरावर असलेल्या सड्यावरील जागामध्ये विकसित केलेल्या असतात. या बागा घरापासून दूर असल्याने अचानकपणे लागणारा वणवा बागेमध्ये पोहोचण्यापूर्वी त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना जाणे शक्‍य होत नाही. त्यामुळे वणव्यापासून बागेचे सरंक्षण करण्याची संधी शेतकऱ्याला मिळत नाही.

वन्यप्राण्यांच्या वावरामुळे लोकवस्तीला धोका

वणव्यांमध्ये जंगलेच्या जंगले नष्ट होत असल्याने वन्यप्राण्यांनी नेमके राहायचे कुठे ? असा प्रश्‍न निर्माण होतो. जंगलेच नष्ट झाल्याने वन्यप्राण्यांची एक साखळीच तुटते. त्यामुळे त्यांच्या जगण्याचाच प्रश्‍न निर्माण होतो. त्यातून वन्यप्राणी भक्ष्यासाठी लोकवस्तीमध्ये घुसण्याच्या अनेक घटना घडत आहेत. भक्ष्य पकडताना लोकांनी केलेल्या अडथळ्यातून त्यांच्यावर या वन्यप्राण्यांनी हल्ला करण्याच्याही घटना घडत आहेत. वन्यप्राण्यांच्या या वाढत्या वावरामुळे लोकवस्तीला एकप्रकारे धोकाच निर्माण झाला आहे.

वृक्षलागवडीनंतर त्याचे संगोपन हवे

पर्यावरणाचा ढासळलेला तोल सावरण्यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणारी ग्रामसमृद्धी योजना, झाडे लावा-झाडे वाचवा यांसारख्या योजनांचा समावेश होतो. या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते. मात्र काहीवेळा ही वृक्षलागवडीची मोहीम केवळ फार्स होताना दिसत आहे. कागदोपत्री लागवड झालेल्या या रोपांचे वटवृक्षामध्ये रूपांतर होण्यासाठी त्याचे संगोपन होणे गरजेचे आहे. ते होत नसल्याने ही वृक्षलागवड केवळ कागदोपत्रीच दिसते.

नुकसानीचा पंचनामा केवळ फार्स

वणव्यामध्ये आग लागून झालेल्या आंबा बागांच्या होत असलेल्या नुकसानीचा संबंधित गावच्या तलाठ्यामार्फत पंचनामा केला जातो. त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करतात. नुकसानभरपाई मिळण्याच्या अनुषंगाने हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तालुका कृषी विभागाला सादर केला जातो. आपत्तीमध्ये होणारी नुकसानीची शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. मात्र वणव्यामध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जात नाही. त्यामुळे नुकसानीचे प्रशासनामार्फत होणारे पंचनामे केवळ फार्सच ठरत आहेत.

शासनाच्या योजनांचा लाभ घेत फळबाग लागवड केली जात आहे. मात्र त्याला वणव्यांपासून धोका निर्माण झाला आहे. वणव्यांपासून फळबागांचे संरक्षण करण्याची शेतकऱ्यांची जशी गरज आहे, तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करून नुकसानभरपाई द्यावी.

- मनोहर गुरव, शेतकरी

मग्रारोहयो योजनेंतर्गत राजापुरात झालेली लागवड

वर्ष लागवड झालेले क्षेत्र (हेक्‍टर) लाभार्थी

२०१७-०१८ ४३९.२ ५६३

२०१८-०१९ २८५.९९ ३६८

२०१९-०२० ३२५.१८ ४०७

२०२०-०२१ २६७.०४ ४२४

वणव्यामध्ये राजापुरातील बागांचे झालेले नुकसान

वर्ष लाभार्थी संख्या आंबा काजू एकूण क्षेत्र (हेक्‍टर)

२०१९-२० ३१ २१.८८ ३.९९ २५.८७

२०२०-२१ ५३ ७.९० १७.७३ २५.६३

kokan farm and Garden fire reasons kokan marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com