esakal | कोकण : मुसळधार पावसामुळे घरात पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

rain

कोकण : मुसळधार पावसामुळे घरात पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णे : काल ता.६ रोजी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्यामुळे हर्णे मध्ये काही ठिकाणी ढोपरभर पाणीच पाणी झाले होते. रात्री बहुतेकांच्या घरात पाणी शिरले होते. बहुतांशी ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे.

शासनाने ५ तारखेपासूनच अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे काल सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि रात्री उशिरा साधारण २ वाजल्यानंतर पाण्याची पातळी वाढायला लागली. हर्णे येथील मेमन कॉलनी, नाथद्वार नगर, शिवाजी चौक याठिकाणी कमरेइतके पाणी झाले होते. नाल्यांमध्ये घाण साचल्यामुळे पाणी सगळीकडे तुंबले होते. हा परिसर संपूर्ण जलमय झाला होता. शिवाजीचौकात बंधाराच नाल्यात पडल्यामुळे पाणी तुंबले होते. तसेच काहींनी झाडांच्या फांद्या देखील तोडून नाल्यात टाकल्या होत्या.

हेही वाचा: औसा तालुक्यात पैशासाठी विवाहितेचा छळ; पती विरोधात गुन्हा दाखल

प्रचंड घनकचऱ्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी नाले सगळे बंद झाले होते. रात्री २ वाजता भरलेले पाणी सकाळी ६ वाजता पाणी ओसरले. तळमजल्यावर असणाऱ्या सर्वांच्या घरात पाणी भरल्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक व इतर वस्तूंचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी हजर राहून तलाठ्यांनी पंचनामे केले.

याआधी पण मेमन कॉलनीमध्ये पाणी भरले होते पण एवढं पाणी कधीच भरले नव्हते. घरात पाणी भरल्यामुळे फ्रिज, मशनरी बेड आदी वस्तूंचे नुकसान झाले आहे. याची भरपाई कोण देणार असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ संजय डोईफोडे यांनी केला.

मी स्वतः ग्रामपंचायतीच्या खर्चाने जेसीबीच्या सहाय्याने अनेक वेळा नाले साफसफाई करून घेतले होते परंतु ग्रामस्थ पुन्हा पुन्हा त्यामध्ये घाण टाकतात त्यामुळे नाले सारखे घाणीने भरून जात आहेत आणि अतिवृष्टीच्या वेळेस पाणी भरपूर ठिकाणी तुंबून खूप नुकसान होत आहे; असे हर्णे ग्रा.पं. सदस्य व मेमन कॉलनीतील रहिवाशी इस्माईल मेमन यांनी सांगितले.

loading image
go to top