रत्नागिरी जिल्ह्यातील 63 पैकी 28 धरणे भरली

राजेश कळंबाटे
मंगळवार, 18 जुलै 2017

रत्नागिरी जिल्ह्यात 63 पैकी 60 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत, तर 3 मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एक व राजापूर तालुक्यात एक आणि संगमेश्वर तालुक्यात एक असे तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून तिन्हींमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 182.69 दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

रत्नागिरी : पावसाचा लपंडाव सध्या जिल्ह्यात सुरूच आहे. मात्र असे असले तरी यावर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. 63 पैकी तब्बल 28 धरणे १०० टक्के भरली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात 63 पैकी 60 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत, तर 3 मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एक व राजापूर तालुक्यात एक आणि संगमेश्वर तालुक्यात एक असे तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून तिन्हींमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 182.69 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. आज या तिन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा 153 दशलक्ष घनमीटर इतका आहे. जिल्ह्यात 60 लघुपाटबंधारे प्रकल्प असून त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता 261.59 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. 

100 टक्के भरलेले प्रकल्प :
मंडणगड - पणदेरी, चिंचाळी
दापोली - सोंडेघर, सुकोंडी, टांगर, पंचनदी, 
खेड - शिरवली, शेलडी
चिपळूण - तिवरे, मालघर, कळंवडे, अडरे, मोरवणे, आंबतखोल, खोपड, 
गुहागर - गुहागर
संगमेश्वर - तेलेवाडी, कडवई, साखरपा
रत्नागिरी - शीळ
लांजा - शिपोशी, व्हेळ, गवाणे, बेणी
राजापूर - बारेवाडी, गोपाळवाडी, वाटूळ

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Kokan news 28 dams overflow in Ratnagiri district