मुंबई-गोवा मार्गावर अपघातात 2 जण ठार

अमोल टेंबकर
रविवार, 4 जून 2017

अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला आहे.

सावंतवाडी - मुंबई-गोवा महामार्गावर पेडणे येथे आज (रविवार) सकाळी रेल्वे रुळ घेऊन जात असलेला कंटेनर पलटी झाल्याने रुळ दुचाकींवर पडल्याने दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून मुंबईकडे येत असलेला कंटेनर सातरडा पुलाजवळ ब्रेक न लागल्याने पलटी झाला. त्यामुळे कंटेनरमधील सर्व रुळ रस्त्यावर पडले. यावेळी बाजून जात असलेल्या चार दुचाकी व एक रिक्षावर ते पडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला आहे. कंटेनर चालकाला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार
सांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का​
नाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'​
'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''​
'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'​

Web Title: kokan news accident on mumbai-goa highway 2 dead