दिवाळी सुट्यांमध्ये बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अमित गवळे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

धंदा चांगला
सुट्यांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. हे भाविक दुकानातून चांगली खरेदी करत आहेत.त्यामुळे धंदा चांगला होत आहे. अजुन अठवडाभर तरी भाविकांची गर्दि राहणार असल्याने समाधानी आहे.
- रणजीत गुरव, श्री अष्टविनायक पापड स्टाॅल

पाली : दिवाळी सुट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या रोज जवळपास पाच हजार भाविक बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आहे. त्यामुळे येथील हाॅटेल व्यावसायिक व दुकानदारांचा धंदा तेजित आहे. 

भाविकांच्या गाड्यांमूळे पालीत वाहतुक कोंडी होत आहे. परंतू पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले अाहे. मंदिर परिसरास यात्रेचे स्वरुप आले आहे.भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीन चोख व्यवस्था करण्यात आली अाहे. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची अाणि खाऊची दुकाने, नारळ, हार , फुल व पापड मिरगुंड विक्रेते,सरबतवाले, प्रसाद व पेढेवाले अादिंचा धंदा चांगला होत आहे. भरलेली दुकाने व गर्दि यामुळे मंदिर परिसर गजबजलेला दिसत आहे. अनेक भाविक स्वतःची वाहने घेवून येत आहेत. तर काही लक्झरी किंवा खाजगी बसेसने येतात. यामुळे पालीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. परंतू नाक्यानाक्यावर तैनात असलेले पोलिस तसेच बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करित आहेत. पाली पोलिस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस योग्य बंदोबस्त ठेवत आहेत.

धंदा चांगला
सुट्यांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. हे भाविक दुकानातून चांगली खरेदी करत आहेत.त्यामुळे धंदा चांगला होत आहे. अजुन अठवडाभर तरी भाविकांची गर्दि राहणार असल्याने समाधानी आहे.
- रणजीत गुरव, श्री अष्टविनायक पापड स्टाॅल

भविकांच्या सेवेसाठी
रात्री उशिरा पर्यंत भाविक पालीत येत असतात. त्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागती. रात्री एक वाजेपर्यंत जेवण पुरवितो. हाॅटेलमधील थालीपिठ, पावभाजी, भजी, स्पेशल राईस प्लेट अादी जिन्नस ग्राहकांना खुप अावडते.
- बाळा मोरे, महाकाली काॅर्नर हाॅटेल

मंदिरासमोरील तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. रंगित कारंजे लावण्यात आले आहेत. बल्लाळेश्वर ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यस्था करण्यात आली आहे, नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे.वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य पार्किंग देखील आहे. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत.त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. 
अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट,पाली 

वाहतुक कोंडी सुटता सुटेना
अरुंद रस्ते, नो एैंन्ट्रिमधुन जाणारी वाहणे, मोठ्या वाहणांची रेलचेल, वाहतुकिचे नियम मोडणारे वाहनचालक अादि कारणांमुळे पालीत वारंवार वाहतुक कोंडी होते. सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व बसेस पालीत दाखल होत आहे. अरुंद रस्त्यांमुळे दोन्ही बाजुने अालेल्या वाहनांना जाण्यासाठी जागा मिळत नाही.परिणामी वाहने अडकून पडून वाहतुक कोंडी होते. अशा वेळी पोलीसांचे प्रयत्न असफल ठरतात. या वाहतुक कोंडीचा त्रास पादचार्यांना सुद्धा होतो. मंदिर परिसरात देखिल अवैध्यरित्या पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतुक कोंडी होते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.

Web Title: kokan news ballaleshwar in pali

टॅग्स