पर्यावरण संवर्धनासाठी लाखो रुपयांवर सोडले पाणी

Rohan Manore
Rohan Manore

पाली ; केवळ सामाजिक बांधिलकी अाणि पर्यावरण संवर्धनासाठी लाखो रुपयांचे उत्पन्न बंद करण्याचे धाडस फार कमी लोक करतात. हे धाडस करुन दाखविले आहे पेण येथील रोहन मनोरे या तरुणाने. जवळपास सात ते अाठ वर्ष मोठ्या जोमात सुरु असलेले फटाक्यांचे दुकान त्यांनी महा अंनिसच्या प्रेरणेने एका झटक्यात बंद केले. फटके शुन्यावर अाणण्याचा केला संकल्प.

पेण येथील चिंचपाडा येथे मनोरे यांचे पाच वर्षापुर्वी फटाक्यांचे एकमेव दुकान अगदी स्थिरस्थावर झालेले.दिवाळीत ग्राहकांनी गजबजलेले आणि दरवर्षी जवळपास तीन ते चार लाख रुपयांची उलाढाल असलेले.चाईल्ड सोशल वर्कर म्हणुन लहान मुले घडविण्याचे काम करत आहोत. समाजसेवक म्हणुन काम करत असतांना अापण फटाक्याच्या माध्यमातून पर्यावरण दुषित अाणि मानवी अारोग्य बिघडविण्याचे काम तर करत नाही ना? याची खंत रोहन मनोर यांना राहून राहुन वाटत होती.त्यातच पाच वर्षापुर्वी अंनिसचे कार्यकर्ते अाणि त्यांचे मित्र कमलेश ठाकूर यांच्या सोबत महाराष्ट्र अंनिसच्या फटाकेमुक्त अभियानाची ओळख झाली. या चळवळीने त्यांना नवी दिशा अाणि प्रेरणा दिली. अाणि क्षणाचाही विचार न करता पाच वर्षापुर्वी (सन २०१२) त्यांनी अापले उत्तम सुरु असलेले फटाक्यांचे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. अाई वृंदा व वडील वसंत मनोरे यांनी त्यांच्या या समाजोपयोगी निर्णयाला मोलाची साथ देत होकार दिला. अशा प्रकारे मनोरे यांनी सगळ्यांसमोर उत्कृष्ट अादर्श ठेवला आहे. 

त्या फटाक्याच्या दुकानाच्या जागी अाता मोबाईल शाॅपी सुरु केली आहे. मागील पाच वर्षांपासून ते फटाके मुक्तीच्या चळवळीत कार्य करत आहेत. रोहन मनोरे यांनी वेलिंगकर काॅलेजमधून मटेरीयल मॅनेजमेंट केले आहे. पाच सहा वर्षांपासून निसर्ग साहस शिबीर या स्वतःच्या संस्थेद्वारे लहान मुलांसाठी साहस शिबीर भरवितात. पेण रोटरी क्लबचे ते अध्यक्ष आहेत. समाजसेवेचे पदवीधर व पदव्युत्त पदवी करणार्या विदयार्थांना मार्गदर्शन ही करतात. त्यांना युथ लिटरशीप अवाॅर्डने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या पुढाकाराने यंदाच्या दिवाळीत रोटरी क्लबने महाराष्ट्र अंनिसच्या फटाकेमुक्ती अभियानासाठी तीन हजार विदयार्थी संकल्प पत्रके मोफत पेण अंनिस शाखेला दिली आहेत. फटाके उडविण्याचा अाणि विक्रिचा स्तर शुन्यावर अाला पाहिजे. फटाक्यांमुळे पर्यावरणात प्रदुषण पसरते, पर्यावरण दुषित होते. याचा मानवासह सजीव अाणि मानवाच्या अारोग्यावर विपरीत परिणाम होतो.अापली कॅनेडियन मैत्रीण येथे अाली होती तेव्हा फटाक्यांची दुकाने पाहून अचंबित झाली होती. कारण तिकडे अापल्या सारखी कुठेही फटाके विकाण्याची किंवा फोडण्याची विषेश परवानगी घ्यावी लागते. असे रोहन यांनी सकाळला सांगितले. तसे अापण घेतल्या निर्णायावर ते खूप अानंदी असुन पैशांपेक्षा अापण एक समाजोपयोगी अाणि पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहोत याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

महा. अंनिसच्या संपर्कात अाल्याने फटाके मुक्ती अभियानाला जोडलो गेलो. हि प्रेरणा घेवून अाईच्या नावे असलेला फटाके विक्रिचा परवाना रिन्यूव्ह न करता फटाके विक्रिचे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. अाई वडिलांनी अमुल्य साथ दिली. याअाधी पेणमध्ये गणपती विसर्जनावेळी पाण्यात टाकले जाणारे निर्माल्य थांबविण्यासाठी काम केले आहे. तसेच मिरवणूकीत होत असलेली गुलालाची उधळण बंद करण्यासाठी अनेकांच्या साथीने प्रयत्न करुन हे प्रमाण शुन्यावर अाणले आहे.वनविभागाच्या मदतीने १३० झाडे लावून ती जोपासण्याचे काम करत आहे. फटाके शुन्यावर नेण्याचा मानस आहे.
- रोहन मनोरे, तरुण, पेण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com