खेड: जगबुडी, नारंगी नदीला पूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

खेडसह परिसरात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टिमुळे खेडच्या जगबुड़ी आणि नारंगी नद्यांना पूर आला आहे. जगबुड़ी नदीचे पुराचे पाणी खेडच्या मटण मार्केटमधे घुसले.

खेड - रविवारी रात्रभर आणि आज (सोमवार) सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे.

खेडसह परिसरात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टिमुळे खेडच्या जगबुड़ी आणि नारंगी नद्यांना पूर आला आहे. जगबुड़ी नदीचे पुराचे पाणी खेडच्या मटण मार्केटमधे घुसले. नगरपालिकेने नागरिकांना धोक्याची सूचना म्हणून तीन वेळा भोंगा वाजवले. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

ईद सण असल्याने मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यात पावसामुळे अडथळे आले. आज सकाळी 8 वाजेपर्यंत 658 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सह्याद्री सायकलिस्टने अमेरिकेत फडकविला तिरंगा
ट्रम्प यांनी मोडली व्हाईट हाऊसमधील "इफ्तार' परंपरा...
शेतकरी व शिवसेना एकत्र आल्यामुळे कर्जमुक्ती- उद्धव ठाकरे​
नितीशकुमारांचे अपने रंग हजार ....​
काळाकुट्ट २५ जून अन्‌ बिनचेहऱ्याचा प्रकाश!​
फेसबुकवरही "विराट'चे विराटप्रेमी​
भारताचा विंडीजवर 105 धावांनी विजय​
सरकारचे तोंड शेतकऱ्यांकडे वळविले - खोत​

Web Title: kokan news flood situation in Khed