सावंतवाडीत सापडली प्लॅस्टीकची अंडी

अमोल टेंबकर
रविवार, 30 जुलै 2017

आकेरकर हे सावंतवाडीत राहतात. त्यांनी नेहमीप्रमाणे मुलांसाठी शहरातील एका बेकरीमधून अंडी आणली होती. आज सकाळी अंड्याचे ऑम्लेट तयार करत असताना अंडी फोडल्यानंतर त्यात प्लॅस्टीकचा पापुद्रा असलेले आवरण दिसले. त्यांनी बर्‍याच दिवसाची अंडी असू शकतात असे वाटत असल्याने ऑम्लेट काढण्यास घेतले. परंतू ऑम्लेट शिजत असताना अंड्यातील बलक तसाच राहिला.

सावंतवाडी : येथील मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष सतीश आकेरकर यांना प्लॅस्टीकची अंडी मिळाली आहेत. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. पत्रकार परिषद घेवून मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी याबाबत जिल्हा अन्नभेसळ विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

आकेरकर हे सावंतवाडीत राहतात. त्यांनी नेहमीप्रमाणे मुलांसाठी शहरातील एका बेकरीमधून अंडी आणली होती. आज सकाळी अंड्याचे ऑम्लेट तयार करत असताना अंडी फोडल्यानंतर त्यात प्लॅस्टीकचा पापुद्रा असलेले आवरण दिसले. त्यांनी बर्‍याच दिवसाची अंडी असू शकतात असे वाटत असल्याने ऑम्लेट काढण्यास घेतले. परंतू ऑम्लेट शिजत असताना अंड्यातील बलक तसाच राहिला. तसेच त्यात प्लॅस्टीकचा तवंग आला. खात्री केली असता त्या अंड्यात प्लॅस्टीकचे पापुद्रे असल्याचे त्यांना दिसले.

याबाबत माहिती त्यांनी मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष अनील केसरकर यांना दिली. संबंधित बेकरी चालकाकडे खात्री केली असता त्या बेकरी चालकानेसुद्धा अंड्याबाबत सांशकता व्यक्त केली. त्यामुळे याबाबतची माहिती केसरकर यांनी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेवून केली. ते म्हणाले, “घडलेला प्रकार हा दुर्दैवी आहे. प्रथमदर्शनी ती अंडी प्लॅस्टीकची असल्याचे दिसून येत आहे. नियमित अंड्याप्रमाणे त्या अंड्याच्या बलकाला वास नाही. त्यात पापुद्रे मिळून आले आहेत. त्यामुळे याबाबत जिल्हा अन्न भेसळ अधिकार्‍यांकडे याची तक्रार पुराव्यासह करणार आहे.”

आकेरकर म्हणाले, “आम्ही रोजच्या जेवणात अंडी खातो. आज सकाळी मी मुलांना ऑम्लेट करून देत होतो. सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मी तयार केलेेले ऑम्लेट मुलांना दिले नाही. ते प्लॅस्टीक सदृष्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित बेकरी मालकाची भेट घेतल्यानंतर अंडी प्लॅस्टीकची असू शकतात. नाकारता येत नाही अशी कबुली बेकरी मालकाने दिली आहे. त्यामुळे याबाबतचा संशय बळावला आहे.” यावेळी राजू कासकर, अतुल केसरकर, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Kokan news plastic eggs found in Sawantwadi

टॅग्स