परतीच्या पावासाने दिवाळी केली भकास

अमित गवळे
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

अाकाश कंदिल लावणार कुठे?
मुलांनी अाकाश कंदिल अाणन्याचा हट्ट केला आहे. परंतू अवकाळी पडणारर्या पावसामुळे अाकाश कंदिल लावायचा कुठे हा प्रश्न आहे.पावसामुळे खरेदीसाठी देखिल बाहेर पडता येत नाही. तसेच फटाके सुद्धा फोडता येणार नाहीत. सगळ्यांचाच मोठा हिरमोड झाला आहे.
- दिलीप सोनावणे, नागरिक, नागोठणे

पाली : दिवाळी तोंडावर येवून ठेपली आहे. परंतू जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मात्र सुकसूकाट अाहे. कारण मागील काहि दिवसांपासून परतीच्या पावासाने जिल्ह्यात सर्वत्र धुडगूस घातला आहे. पावासामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत नाहित.तसेच शेतकर्याचे पिक अजुनही शेतात आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हाती पैसा नाही. पाऊस अाणि दिवाळिचे गंमतीदार मेसेज फेसबुक अाणि व्हाॅट्सअपवर व्हायरल होत आहेत.

विजांच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाटात परतीचा पाऊस येतो.अशा वेळी दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाहेर पडत नाही. व्यापारी व दुकानदारांनी दिवाळीचा लाखो रुपयांचा माल भरुन ठेवला आहे.परंतू ग्राहक नसल्याने एैन दिवाळीत वस्तुंना उठाव नाही. त्यामुळे व्यवासयिक व व्यापारी पुरते हवालदिल झाले आहेत. अजुन शेतकर्याचे धान्य शेतात अाहे. सुगाीच्या दिवसांना अजुन सुरुवात झालेली नाहि. त्यात परतीच्या पवासाने भाताचे (पिकांचे) पुरते नुकसान केले आहे. हाती शिल्लक राहिलेले धान्य विकल्याशिवाय शेतकर्याच्या हाती पैसा नाही. तो धास्तीत अाणि हताश आहे. महिन्याच्या मध्यावर दिवाळी अाली असल्याने अनेकांचा हिशोब अाणि टाळेबंद बिघडला आहे. जीएसटीमुळे अाकाश कंदिल, इलेक्ट्रिक वस्तू अादिंचे भाव वाढले आहेत. अशा सर्व कारणांमुळे सध्या बाजारपेठा ओस पडल्या आहेत. अाज उद्या पाऊस थोडा थांबल्यास काहि अशी बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ शकते.

अाकाश कंदिल अाणि लाईटिंग, दिव्यांच्या किंमती वीस ते तीस टक्यांनी वाढल्या
जीएसटीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी अाकाश कंदिल,इलेक्ट्रिक वस्तू अाणि लाईटिंग दिव्यांच्या किंमतीमध्ये वीस ते तीस टक्यांनी वाढ झाली आहे. बाजारात खरेदीसाठी येणारा ग्राहक वस्तुंचा भाव कमी करुन मागतो. उदा. मागील वर्षी शंभर रुपये असलेला अाकाश कंदील अाता एकशे वीस ते एकशे तीस रुपयांना मिळतो.ग्राहक हा कंदिल शंभर रुपयांनी मागतात परंतू भाव कमी करुन देणे दुकानदारास परवडत नाही. परिणामी नाईलाजाने ग्राहकाला परत पाठवावे लागते. पालीतील एका दुकानदाराने सांगितले की पावसामुळे एकतर ग्राहक येत नाहीत अाणि वाढीव किंमतीमुळे वस्तू विकल्या जात नाहीत.

फटाके, कपडे अादी दुकाने देखिल ओस
सततच्या पावसामुळे फटाक्यांचा माल खराब होत आहे. दुकानाबाहेर विक्रिसाठी सुद्धा फटाके ठेवता येत नाही. तसेच पणत्या, दिवे व रांगोळी विक्रेत्यांना देखिल पावसाचा फटका बसला आहे. मातीचे दिवे किंवा पणत्या तर पावसामुळे ओल्या होऊन खराब होत अाहेत.अशी अवस्था फटाके विक्रेत्यांची आहे. तर कपडे विक्रेते देखिल पावसामुळे ग्राहक न अाल्याने मेटाकूटीला अाले आहेत.

बच्चे कंपनीचा हिरमोड
दिवाळित बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मशगुल असते. परंतू सततच्या पावासाने मुलांना किल्ले बनविता येत नाहीत. ज्यांनी किल्ले तयार केले अाहेत त्यांचे किल्ले सुद्धा पावसामुळे खराब झाले किंवा तुटले आहेत. तसेच पावसामुळे फटाके फोडता येवू शकत नाही. घराबाहेर हौशीने अाकाश कंदील व पणत्या लावता येत नसल्याने बच्चे कंपणीचा हिरमोड झाला आहे.

पाऊस अाणि दिवाळीचे मेसेज फेसबुक अाणि व्हाॅट्सअपवर व्हायरल
एैन दिवाळीच्या तोंडावर अाणि अाॅक्टोंबर महिन्याच्या मध्यावर पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे लोकांची कशी फजिती अाणि दैना उडत आहे. पावसामुळे काय काय परिणामांना सामोरे जावे लागत आहे. याचे लज्जतदार मेसेज फेसबुक अाणि व्हाॅट्सअपवर व्हायरल होत आहेत. या दिवाळीला एकच काम करायचे..........सकाळी उटणे लावून बाहेर जाऊन फक्त बसायचे अांघोळ काय ते पाऊस बघून घेईल, हे वरुण देवा… एक ईचारू काय? अामी दिवाळीत नवी कापडं घालून हिंडायचं, का रेनकोट घालून ते सांग… अस कुटं अासतंय व्हयं?, मी काय म्हणतोय यंदाच्या दिवाळित पाऊस लावायचा .… कि, पहायचा....? अशा प्रकारचे काही गमतीदार मेसेज व्हायरल होत आहेत.

परतीच्या पावसामुळे लोक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बाजारपेठांध्ये सुकसूकाट आहे. मागील वर्षी दिवाळित खुप चांगला व्यवसाय झाला होता. परंतु यावर्षी मात्र पावसामुळे दिवाळीच्या तोंडावर देखिल ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.
- प्रल्हाद खाडे, व्यवसायिक

अाकाश कंदिल लावणार कुठे?
मुलांनी अाकाश कंदिल अाणन्याचा हट्ट केला आहे. परंतू अवकाळी पडणारर्या पावसामुळे अाकाश कंदिल लावायचा कुठे हा प्रश्न आहे.पावसामुळे खरेदीसाठी देखिल बाहेर पडता येत नाही. तसेच फटाके सुद्धा फोडता येणार नाहीत. सगळ्यांचाच मोठा हिरमोड झाला आहे.
- दिलीप सोनावणे, नागरिक, नागोठणे

Web Title: Kokan news Rain in raigad district