कोकणच्या देवळांची परंपरा जपा : प्रमोद सावंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

सावंत भोसले वस मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचा ज्यावेळी संकल्प सोडण्यात आला होता. त्यावेळी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. हे मंदिर पूर्ण होणार की नाही याबाबत अनेक प्रश्‍न होते; मात्र देवाच्या कृपने साठलाख रुपयाचे मंदिर निर्माण झाले आहे.

सावंतवाडी : 'कोकणाला देवळांची परंपरा आहे; मात्र नव्या पिढीपर्यत ही संस्कृती पोहोचण्यासाठी जुन्या काळातील मंदिरांचा जीर्णोध्दार होणे काळाची गरज आहे', असे मत गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी आज येथे व्यक्त केले.

दरम्यान नुकत्याच झालेल्या गोव्याच्या निवडणूकीत अनेक दिग्गजांना घरी बसावे लागले; मात्र केवळ कुणकेरी येथील भावई देवाच्या आर्शीवादाने मला पुन्हा एकदा संधी मिळाली असा विश्‍वास सावंत यांनी व्यक्त केला.

कुणेकरी येथील श्री देव नागोजी सावंत भोसले वस व श्री देव गणपती मंदिराचा जीर्णोध्दार सावंत यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, आर्कीटेक्ट नंदन सावंत, आबा न्हावेलकर, गावच्या सरपंचा मनाली परब, माजी सरपंच शशिकांत सावंत, वसंत कुणकेश्‍वर, ज्ञानेश्‍वर परब, प्रकाश सावंत, सखाराम सावंत, वसंत गावडे, मधुकर परब, महादेव परब, जी श्रीनावसन, अभि सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी सावंत म्हणाले, “कोकणाला देवळाची परंपरा आहे. ती परंपरा जपण्याचे काम येथील लोकांनी केले आहे ही कौतुकाची बाब आहे. आजपर्यत मी अनेक कामे केली; मात्र मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचे मला सावंत भोसले घराण्याने दिले त्यांचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. केवळ देवाचा आर्शीवाद पाठिशी असल्यामुळे मी सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबात जन्मलेलो असताना आमदार आणि विधानसभा सभापतीपद भुषविता आले. तसेच केवळ भावई देवीच्या कृपेने मला पुन्हा एकदा निवडणुकीत संधी मिळाली.” 

यावेळी माजी सभापती सावंत यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “सावंत भोसले वस मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचा ज्यावेळी संकल्प सोडण्यात आला होता. त्यावेळी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. हे मंदिर पूर्ण होणार की नाही याबाबत अनेक प्रश्‍न होते; मात्र देवाच्या कृपने साठलाख रुपयाचे मंदिर निर्माण झाले आहे. तसेच गावातील बारा पाचाच्या पंचायतानाचे काम सुध्दा तितक्याच जोमाने सुरू आहे. त्यामुळे भविष्यात याचा फायदा गावातील लोकांना होणार आहे.” 

यावेळी मंदिर उभारण्यासाठी सहकार्य करणार्‍या आबा न्हावेलकर, आर्किटेक्ट नंदन वेंगुर्लेकर, डिझायनर जी. श्रीनिवासन यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मंगेश सावंत यांनी केले. यावेळी नितीन सावंत, तानाजी सावंत, लक्ष्मण सावंत, विजय सावंत, दीपक सावंत आदी उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

उद्योगजकतेच्या दिशेने तरूणाईने टाकले एक पाऊल पुढे
मुंबई सांताक्रूझ परिसरात 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या
उद्या लागणार बारावीचा निकाल
गाण्यांत वापरली इंग्रजी, हिंदी भाषा तर बिघडले काय? : महेश मांजरेकर
गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर
नोटाबंदीने जिल्हा बँका अडचणीत : शरद पवार
इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प
... आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!
दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री

Web Title: Kokan News Ratnagiri News Pramod Sawant Temples in Kokan