सावंतवाडीत रिक्षा चालकांचे भजन आंदोलन

अमोल टेंबकर
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सावंतवाडीतच रिक्षा पासिंग व्हाव्यात या मागणीसाठी कॅम्पच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कॅम्पवर परिणाम झाल्याचे दिसून आले. लायसन्स काढण्यासाठी आलेले अनेक जण ताटकळत बसले होते.

सावंतवाडी : आरटीओ विरोधात सावंतवाडीत रिक्षा चालकांचे अनोखे भजन आंदोलन केले.

सावंतवाडीतच रिक्षा पासिंग व्हाव्यात या मागणीसाठी कॅम्पच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कॅम्पवर परिणाम झाल्याचे दिसून आले. लायसन्स काढण्यासाठी आलेले अनेक जण ताटकळत बसले होते. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, मोरया रे बाप्पा मोरया रे, असे आवाहन करून भजन आंदोलन करण्यात आले.

आम्ही मागण्या वरिष्ठांना कळविल्या आरटीओ अधिकारी मुरलीधर मगदुम यांनी माहिती दिली. तर मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही असा संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊ पाटील यांनी इशारा दिला. सुधीर पराडकर, अतुल माणकेश्वर, शामसुंदर नाईक, जयराम टंगसाळी, राजू पवार, आग्नेल डीसोझा आदी उपस्थित होते.

Web Title: Kokan news rickshaw driver agitation in sawantwadi