सावंतवाडी: खासगी बसचालकांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

अमोल टेंबकर
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पालकमंत्री आणी प्रशासनाचे आदेश धाब्यावर 
मुंबईतून कोकणात येणाऱ्या सावंतवाडीतील प्रवाशांना महामार्गावर न उतरता शहरात आणावे असे आदेश खुद्द शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर दिले होते. तशी अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे आंदोलन करावे लागले.

सावंतवाडी : शहराच्या बाहेर महामार्गावर प्रवाशांना सोडणाऱ्या खासगी बसचालकांना दणका देण्यासाठी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने आज (शनिवार) पहाटे नियोजीत झाराप पत्रादेवी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी काही झाले तरी बसेस शहरातून नेल्या तशी तिकीटाची रक्कम घेतली जात असल्यामुळे सेवा दिलीच पाहिजे. ग्राहकांना वाटेत उतरून घातल्यास गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. जमावबंदीचे कारण पुढे करीत कुडाळ पोलिसांनी  कार्यकर्त्यांना स्थानबध्द केले. 

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशानुसार कार्यकर्ते ताब्यात घेतले असा दावा पोलिसांनी केला आहे. यावेळी जि. प. सदस्य मायकल डिसोजा, माजी सभापती अशोक दळवी, चंद्रकांत कासार, राजू शेटकर, मेघश्याम काजरेकर, संदीप गवस, संतोष राऊळ, संदीप माळकर, शिवदत्त घोगळे, माजी सभापती बबन बोभाटे, सुहास सावंत,पप्पू ठिकार, उमेश गावकरसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

पालकमंत्री आणी प्रशासनाचे आदेश धाब्यावर 
मुंबईतून कोकणात येणाऱ्या सावंतवाडीतील प्रवाशांना महामार्गावर न उतरता शहरात आणावे असे आदेश खुद्द शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर दिले होते. तशी अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे आंदोलन करावे लागले.

Web Title: Kokan news Shiv Sena agitation sawantwadi