अलिबागच्या समुद्रात दोघांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सौरभ खान (23), वृषभ सिवा (35) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे असून, ही घटना आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. या दोघांसह पाचजण रसायनीच्या
होमडेकोर कंपनीतून आज अलिबागला फिरायला आले होते. या पाचजणांपैकी दोघेजण अलिबागच्या किनाऱ्यावर बसून राहिले, तर सौरभ खान (23), वृषभ सिवा (35)
आणि सुरेश स्वामी (56) हे तिघेजण अलिबागच्या समुद्रातील कुलाबा शिवकालीन किल्ल्यात फिरायला गेले होते.

अलिबाग : येथील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या रसायनीच्या होमडेकोर कंपनीतील पाच कामगारांपैकी दोघांचा समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह समुद्राच्या भरतीच्या पाण्यात बेपत्ता झाले असून, हे मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 

सौरभ खान (23), वृषभ सिवा (35) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे असून, ही घटना आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. या दोघांसह पाचजण रसायनीच्या
होमडेकोर कंपनीतून आज अलिबागला फिरायला आले होते. या पाचजणांपैकी दोघेजण अलिबागच्या किनाऱ्यावर बसून राहिले, तर सौरभ खान (23), वृषभ सिवा (35)
आणि सुरेश स्वामी (56) हे तिघेजण अलिबागच्या समुद्रातील कुलाबा शिवकालीन किल्ल्यात फिरायला गेले होते.

परतीच्या वेळी समुद्राला भरती सुरु झाल्याने किल्ल्यातील काही नागरिकांनी त्यांना जाऊ नका असे सांगितले. परंतु या तिघांनी त्याकडे दुर्लक्ष करीत किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भरतीचे पाणी अधिक वाढल्याने या भरतीच्या पाण्यात तिघेही सापडले. पैकी सौरभ खान आणि वृषभ सिवा हे दोघे बुडू लागताच पोहता येत असलेल्या सुरेश स्वामीने त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु मोठ्या भरतीच्या लाटेत हे दोघेही वाहून गेले आणि सुरेश स्वामी यांनी पोहत किनारा गाठला. त्याने किनाऱ्यावरील आपल्या अन्य दोन सहकाऱ्यांना ही बातमी सांगताच किनाऱ्यावरील लाईफगार्डच्या माध्यमातून वाहून गेलेल्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला. अलिबाग पोलिसांना ही माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डी.बी. निघोट, अलिबागचे पोलिस निरिक्षक सुरेश वराडे आणि त्यांचे सहकारी तसेच अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बोटीच्या माध्यमातून बेपत्ता दोघांना शोधण्याचा प्रयत्न सुरु केले, परंतु समु्द्राला असलेल्या मोठ्या भरतीमुळे दोघांचेही मृतदेह हाती लागले नाहीत. त्यामुळे हे मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे अलिबागचे पोलिस निरिक्षक सुरेश वराडे यांना सांगितले.

Web Title: Kokan news two youths drowned in sea