कोकणातील महत्वाच्या सणाला कोरोनाचे सावट ; खेड बनले हॉटस्पॉट

kokan shimga festival Khed became a hotspot covid 19 marathi news ratnagiri
kokan shimga festival Khed became a hotspot covid 19 marathi news ratnagiri

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांचे   प्रमाण वाढले आहे. काही दिवसापूर्वी एकाच वाडीत 27 जणांना कोरोनाची लागण झाली. तसेच गेल्या पाच दिवसात खेड तालुक्यात कोरोनाचा आकडा 68 वर गेला आहे. त्यामुळे रत्नागिरी आता कोरोना हॉटस्पॉट ठरते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. काही दिवसावर येऊन ठेपलेला कोकणाचा अत्यंत महत्त्वाचा असणारा सण शिमगा( होळी ) आपल्याला पाहायला मिळणार की नाही अशी भिती आता कोकणवासियांना लागुन राहिली आहे.

 खेड याठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिक नियमांचे पालन करत नसतील तर शासनाने त्यांच्यावर कडक निर्बंध आणून कारवाई करावी अशा सूचना  जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना  आमदार योगेश कदम यांनी केल्या आहेत शुक्रवारी दापोली-खेडचे आमदार योगेश कदम यांनी  आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला. याठिकाणी कोव्हिड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

काल 24 तासांमध्ये 19 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढे चिंतेची बाब ठरली आहे. खेड येथे एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 359 वर पोचली असून मृत्यूदर 3.66 टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची बैठक घेऊन सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात आज 19 नवीन कोरोना बाधित सापडले. त्यामध्ये आरटीपीसीआर 9, तर ऍण्टीजेन चाचणीमध्ये 10 बाधित सापडले. 

रत्नागिरी तालुक्‍यात 6, खेड 1, चिपळूण 5, संगमेश्‍वर 6, राजापूर 1 रुग्ण सापडला. तर 14 जणांनी आज कोरोनावर मात केली असून आजवर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 305 झाली आहे. मात्र रुग्ण संख्या वाढू लागल्याने रुग्ण बरे होण्याचा प्रमाण घसरून 94.89 झाले आहे. जिल्ह्यात काल 258 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकूण निगेटिव्ह स्वॅबची संख्या 76 हजार 600 आहे. जिल्ह्यात विविध कोविड सेंटरवर उपचार घेणाऱ्यांची संख्याही 110 झाली आहे. 

तसेच 68 कोरोनाबाधितांपैकी 40 हून अधिक रुग्ण खेडच्या वरवली गावातील असून हे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. शिवाय खेड तालुक्यातील अंबावली, पन्हाळजे, देवसडे, भरणे, धामनंद, चिंचघर, कुरवळ-जावळी, चिंचवली, मानी या गावांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने याठिकाणी कंटेनमेंट झोन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

संपादन-अर्चना बनगे
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com