तळेरे - कोल्हापुर मार्गावर कोकिसरे ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

काहीही तोडगा न निघाल्यामुळे संतप्त झालेल्या तीनशेहुन अधिक ग्रामस्थांनी पोलीस स्थानकासमोरच रास्ता रोको केला. तळेरे-कोल्हापुर हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल दीड तास रोखल्यामुळे वाहतुक ठप्प झाली.

वैभववाडी - कोकिसरे येथील महालक्ष्मी मंदीराला ग्रामस्थांनी लावलेले कुलुप काढणार्‍यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी ग्रामस्थांनी काल (ता.5) पासुन सुरू केली आहे. त्याच पार्श्वभुमीवर आज ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी आणि त्यानंतर तहसिलदार संतोष जाधव यांच्याशी चर्चा केली; मात्र चर्चेतुन काहीही तोडगा न निघाल्यामुळे संतप्त झालेल्या तीनशेहुन अधिक ग्रामस्थांनी पोलीस स्थानकासमोरच रास्ता रोको केला. तळेरे-कोल्हापुर हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल दीड तास रोखल्यामुळे वाहतुक ठप्प झाली.

दरम्यान महामार्ग बेेकायदेशीररित्या रोखलेला आहे. त्यामुळे तातडीने खुला करा. अन्यथा कायदेशीररित्या कारवाई करू, असा इशार पोलिस निरिक्षक दत्तात्रय बाकारे यांनी आंदोलनकर्त्यांना दिला. यानंतर ग्रामस्थांनी आपला मोर्चा तहसिल कार्यालयाकडे वळविला.

कोकिसरे येथील महालक्ष्मी मंदीराला ग्रामस्थांनी घातलेले कुलुप शनिवारी रात्री (ता.4) अज्ञाताने काढले. हे कुलुप दुसर्‍या गटाने काढल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पोलीसांत धाव घेत कुलुप काढणार्‍यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली; मात्र पोलीसांनी या वादात हस्तक्षेप करण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी तहसिलदारांकडे बोट दाखविले. त्यामुळे आज ग्रामस्थांनी तहसिलदारांची भेट घेतली; मात्र चर्चेतुन काहीही तोडगा न निघाल्यामुळे संतप्त झालेल्या तीनशेहुन अधिक ग्रामस्थांनी पोलीस स्थानकासमोरच रास्ता रोको केला. तळेरे-कोल्हापुर हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल दीड तास रोखल्यामुळे वाहतुक ठप्प झाली.

महालक्ष्मी मंदीरावरून गेल्या काही वर्षापासुन दोन गटात वाद आहेत. त्यामुळे गावातील वार्षीक उत्सव बंदच आहेत. दरम्यान 23 मे रोजी मंदीरात घडलेल्या कथित प्रकारावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी 25 मे रोजी महालक्ष्मी मंदीराला टाळे ठोकले होते.

Web Title: Kokisare Villagers agitation on Talere - Kolhapur Road