कोळंब पूल प्रश्नावरून तीव्र आंदोलनाचा इशारा

कोळंब पूल प्रश्नावरून तीव्र आंदोलनाचा इशारा

मालवण - कोळंब पूल वाहतुकीस बंद करण्यापूर्वी जवळचा पर्यायी मार्ग करा. याची कार्यवाही झाल्याशिवाय पूल दुरुस्तीचे काम करण्याचे धारिष्ट्य सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा ग्रामस्थ याप्रश्नी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कृष्णनाथ तांडेल यांनी आज ग्रामस्थांच्या बैठकीत दिला. 

कोळंब पूल दुरुस्तीसाठी 20 ऑक्टोबरनंतर केव्हाही पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. या पार्श्वभूमीवर कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात कोळंब पूल संघर्ष समितीची ग्रामस्थांसमवेत बैठक झाली.

यावेळी स्वाभिमान तालुकाध्यक्ष मंदार केणी,संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपी तांडेल, सभापती सोनाली कोदे, सरपंच प्रतिमा भोजने, विजय नेमळेकर, अनिल निव्हेकर, संदीप भोजने, महेश मांजरेकर, कृष्णनाथ तांडेल, सार्वजनिक बांधकामचे अभियंता प्रकाश चव्हाण, नितीन दाणे, प्रकल्प व्यवस्थापक सुमित शर्मा, अवि नेरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूल सर्व वाहतुकीस बंद झाल्यास स्थानिक ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. निव्हे- आडारी या पर्यायी रस्त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीचे काय झाले असा प्रश्न संदीप भोजने यांनी उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी या रस्त्यालगत कांदळवन असल्याने त्या रस्त्याचे काम करता आले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सार्वजनिक बांधकामच्या आडमुठे धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सांगितले. या पर्यायी रस्त्याच्या कामासाठी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात यावे असे सांगण्यात आले.

यावेळी झालेल्या चर्चेत सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कोळंब पूल धोकादायक असल्याने ते दुरुस्तीसाठी ते बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. यावर संतप्त ग्रामस्थांनी तूम्ही एवढी वर्षे झोपला होता का? असा प्रश्न केला. सध्या जो पर्यायी रस्ता आहे तो रस्ता जंगलमय भागातून येत असल्याने त्या रस्त्यावरून रात्रीच्यावेळी महिला प्रवास करणार कसा? त्यामुळे जोपर्यंत जवळचा पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत या पुलाचे काम होऊ देणार नाही. तरीही ग्रामस्थांचा विरोध न जुमानता अधिकाऱ्यांनी काम सुरू केल्यास ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपीनाथ तांडेल यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com