कोळंब पूल वाहतुकीस धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मालवण - मालवण-आचरा-देवगड मार्गाला जोडणाऱ्या कोळंब पुलास काही ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीस धोकादायक  झाला असल्याचे बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय पाहणी अहवालातून पुढे आले आहे. 

दरम्यान, या पुलाची काल (ता. १२) मुंबईच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी केली. या पाहणीत पुलाच्या पिलरची तपासणी करण्यात आली. शासनाकडे पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या कामासाठी तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. 

शहरालगत कोळंब खाडी पात्रावर १९६३ मध्ये पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला आता ५४ वर्ष पूर्ण झाली आहेत. जुलै २०१६ मध्ये घडलेल्या महाड पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व जीर्ण पुलांची उच्चस्तरीय तपासणी करण्यात आली होती. त्यात कोळंब पुलाचीही तपासणी केली होती. त्याचा अहवाल येथील बांधकाम विभागास प्राप्त झाला आहे. मात्र पूल धोकादायक असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आल्याने पुलाच्या दोन्ही बाजूस गतिरोधक उभारण्यात आले आहेत. पुलावर अवजड वाहनांना बंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत; मात्र पुलावरून अवजड वाहतूक रोखण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर असणार आहे.

कोळंब पूल धोकादायक बनला असला तरी आचरा-देवगड मार्गावर जाण्यासाठी जवळचा अन्य कोणताही मार्ग नाही. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; मात्र हा धोकादायक पूल आहे त्याच ठिकाणी ठेवताना त्याच्या बाजूलाच नवा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांमधून करण्यात येत आहे.

Web Title: kolamb bridge dangerous for transport