कोलझरला वादळी वाऱ्याचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कोलझर - परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. येथे सुरूचे झाड पडून वीज पुरवठा खंडित झाला.

कोलझर - परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. येथे सुरूचे झाड पडून वीज पुरवठा खंडित झाला.

परिसरात आज सकाळी आठच्या दरम्यान पावसाला वादळाची जोड मिळाली. यामुळे ठिकठिकाणी झाडे पडली. याचा सर्वाधिक फटका कोलझरला बसला. येथील समाजसेवा हायस्कूल समोरील सुरूचे जुनाट झाड कोसळले. समोर असलेल्या वीज वाहिनीवर पडून सर्व वाहिन्या खाली आल्या. यात तीन खांब तुटले. यामुळे पुरवठा खंडीत झाला. कोलझर टेंबवाडीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वाहिन्या मागच्या बाजूला तोडून अर्ध्या गावातील पुरवठा सुरळीत केला; मात्र यात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांची पूरसदृश्‍य स्थिती आहे. इतर गावांमध्येही झाडे पडून हानी झाली आहे. तळकट येथे घरावर झाड पडल्याचा प्रकार ताजा असतांनाच कोलझरमध्येही नुकासनसत्र सुरु झाल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.

Web Title: kolzar konkan news Thunder storm